

Fitness For Women
esakal
आजच्या काळात स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. म्हणूनच त्यांच्या शरीरात ऊर्जा आणि ताकद असणे अत्यावश्यक आहे. फिटनेसचा अर्थ फक्त सडपातळ शरीर नाही, तर मजबूत हाडे, कार्यक्षम स्नायू आणि स्थिर मन! स्ट्रेंथ ट्रेनिंग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. ते तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर आतूनही मजबूत करते.
वजन उचलल्यावर माझे शरीर जाड किंवा ‘पुरुषी’ दिसेल असा चुकीचा समज अनेकदा महिलांमध्ये दिसतो. पण या विचारात तथ्य नाही. स्त्रियांच्या शरीरात टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन खूप कमी प्रमाणात असते, त्यामुळे पुरुषांप्रमाणे मोठे स्नायू स्त्रियांच्या शरीरात सहज तयार होत नाहीत. उलट स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याने शरीर टोन होते, फॅट कमी होते आणि एक आकर्षक, स्वस्थ बांधा मिळतो. माझ्या अनुभवावरून सांगायचे झाले, तर ज्या स्त्रिया आठवड्यातून किमान तीन वेळा योग्य पद्धतीने व्यायाम करतात, त्यांचा आत्मविश्वास, झोप, मनःशांती आणि शरीराच्या पोश्चरमध्ये सर्वांगीण सुधारणा होते.