Premium|AI And Employment Trends : तरुणांच्या बेरोजगारीसाठी एआय नव्हे, रिमोट वर्क जबाबदार?

Remote Work And Youth Unemployment : तरुणांमधील वाढत्या बेरोजगारीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा रिमोट वर्क अधिक जबाबदार असल्याचे संशोधनातून समोर आले असून, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या कमी संधी हा चिंतेचा विषय ठरत आहे.
AI And Employment Trends

AI And Employment Trends

esakal

Updated on

रोहित वाळिंबे

एकीकडे जगभरातील विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांमुळे उद्योग जगतावर होणारा विपरीत परिणाम आणि दुसरीकडे तंत्रज्ञानात झपाट्याने होणारे बदल यांमुळे युवकांसमोर रोजगारासंबंधीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ नोंदवली गेली नसली, तरी तरुणांना चांगल्या नोकऱ्या मिळवणे नक्कीच कठीण झाले आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अधिक भर पडत असल्याचा समज सध्या निर्माण झाला आहे. मात्र या समजुतीला छेद देणारा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, रोजगाराबाबतच्या समस्यांची वेगळीच कारणे यातून समोर आली आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) जगभर मोठ्या प्रमाणात नोकरकपात होण्याची शक्यता असून, भविष्यात अनेकांच्या नोकऱ्यांवर एआयमुळेच गदा येणार आहे, असा एक समज सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. ज्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाची जागा घेऊ शकलेली नाही किंवा भविष्यातही ती जागा घेण्याची शक्यता फार कमी आहे, अशा क्षेत्रांत काम करणाऱ्यांनाही एआयमुळे आपल्या रोजगारावर परिणाम होणार, अशी भीती निर्माण झाली आहे. मात्र, या समजुतीला छेद देणारा एक अहवाल अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकिंग व्यवस्थेतील सर्वांत महत्त्वाच्या संस्थांपैकी एक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या ‘लिबर्टी स्ट्रीट इकॉनॉमिक्स’वर प्रकाशित झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com