SIP : नवीन वर्षात गुंतवणूक करू इच्छिता?

नवगुंतवणूकदारांनी योग्य विचाराने गुंतवणुकीची आखणी केल्यास मनातील गोंधळ कमी होऊन शांतता लाभेल. शेवटी आपण सगळ्या गोष्टी मनःशांतीसाठीच तर करतो.
 SIP
SIPsakal

विक्रम अवसरीकर

गुंतवणूक करू इच्छिता? गुंतवणूक करायचा विचार पहिल्यांदाच करताना बहुतेक वेळा ‘नक्की काय करायचे’ ह्या विचाराने गोंधळून जायला होते.

नवीन वर्षात नव्याने गुंतवणूक करायला सुरुवात करायची असेल तर पुढील मुद्द्यांचा विचार केल्यास स्पष्टता येण्यास मदत होईल.

गुंतवणूक करण्यासाठी रक्कम निश्चित करणे -

आपले निश्चित खर्च, मनोरंजनासाठीचे खर्च, थोडीशी रोख रक्कम बाजूला ठेवणे ह्यासाठी लागणारी रक्कम निश्चित करणे. आपल्या उत्पन्नातून ही रक्कम वजा जाता उरलेली रक्कम म्हणजेच गुंतवणूक करण्यासाठी वापर करायची रक्कम.

गुंतवणुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या रकमेचा वापर -

एकदा का गुंतवणूक करण्यासाठी रक्कम शोधली की त्यातील दीर्घ मुदतीसाठी किती आणि कमी मुदतीसाठी किती रक्कम अडकवून ठेवायची, किती रक्कम तरल ठेवायची, किती रक्कम तुलनेनी कमी धोक्याच्या ठिकाणी गुंतवायची, किती रकमेवर धोका पत्करावा हे निश्चित करावे. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत ह्याची स्वतःलाच कल्पना येईल.

 SIP
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

वेगवेगळ्या पर्यायांची सखोल माहिती घेणे -

गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्या पर्यायांच्या आर्थिक नावांनी गडबडून न जाता प्रत्येक पर्याय सोप्या शब्दात समजून घ्यावा. त्यासाठी एखाद्या तज्ज्ञाची मदत घ्यावी किंवा स्वतः शोधावे.

रकमेची विभागणी करणे -

आपल्याजवळ आता गुंतवणूक करण्याच्या रकमेचा आकडा आणि वेगवेगळ्या पर्यायांची माहिती आहे. त्या आधारे तज्ज्ञांच्या मदतीने किंवा आपण स्वतः अभ्यास करून आपल्या परिस्थितीनुसार कुठेवकिती रक्कम गुंतवावी व कशी गुंतवावी ह्याचा निर्णय घ्यावा.

प्रत्यक्ष गुंतवणूक -

प्रत्येक पर्यायाची माहिती घेतानाच प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकतो ह्याची माहिती घ्यावी. आणि योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून गुंतवणूक करावी.

संयम बाळगणे -

गुंतवणूक केल्यानंतर चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक वाढण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपण जी गुंतवणूक ज्या काळासाठी केली आहे त्यासाठी अधीर न होता संयम बाळगावा.

 SIP
Mutual Fund SIP : वेल प्लेड एसआयपी!

काय करावे -

आपल्याला काही समजतच नाही अशी परिस्थिती असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.

काय करू नये -

आततायी पद्धतीने एकदम सगळीच गुंतवणूक करणे टाळावे. स्वयंघोषित तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यावर आंधळा विश्वास ठेवू नये. एकदम मोठी जोखीम असलेले पर्याय निवडू नयेत.

टॅक्सविषयी काळजी घेणे -

आपण केलेल्या गुंतवणुकीतून किती कर द्यावा लागेल, कुठल्या गुंतवणुकीवर किती कर असतो ह्याची पूर्ण माहिती घेऊन ठेवावी.

विविध पर्यायांचा वापर -

सगळीच्या सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून विभागून ठेवावी. त्यामुळे जोखीम कमी व्हायची शक्यता वाढते.

नवगुंतवणूकदारांनी ह्या पद्धतीने आपल्या गुंतवणुकीची आखणी केल्यास गोंधळ कमी होऊन शांतता लाभेल. शेवटी आपण सगळ्या गोष्टी मनःशांतीसाठीच तर करतो

 SIP
SEBI SIP : आता 250 रुपयांपासून सुरू करता येणार 'एसआयपी'? सेबीने मांडला प्रस्ताव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com