Premium|Sugar Spike During Festivals : मिठाई पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही; सणांत शुगर स्पाइक टाळण्याचा सोपा मार्ग

Healthy Festive Eating : सणांच्या दिवसांत मोदक, लाडू आणि मिठाई पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. योग्य प्रमाण, हळूहळू खाणे आणि गोड पदार्थांवर नियंत्रण ठेवल्यास रक्तातील साखरेची वाढ टाळण्यास मदत होऊ शकते.
Sugar Spike During Festivals

Sugar Spike During Festivals

esakal

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

सणांच्या दिवसांत आवडता गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची अजिबात गरज नाही. मुख्य खेळ हा प्रमाणाचा असतो. एकाच वेळी दोन ते तीन मोदक किंवा लाडू खाण्याऐवजी केवळ एक लहान मोदक खाऊन जिभेचे चोचले पुरवावेत. गोड पदार्थ हळूहळू बारीक चावून खाल्ल्यास कमी प्रमाणामध्येही मनाला आणि जिभेला पूर्ण तृप्ती मिळते. प्रमाणावर ताबा ठेवल्यास साखरेचा स्पाइक सहज टाळता येतो.

गौ री-गणपती, नवरात्र आणि दिवाळी हे सण ओळीने येत असल्याने भारतीय घरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते. सण म्हटले की घराघरांत मोदक, लाडू, पेढे आणि नवनवीन मिठायांची रेलचेल सुरू होते. सणांचा आनंद लुटताना मिठाया खाणे अगदी साहजिक आहे. परंतु या दिवसांत अतिप्रमाणात गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वर जाते, त्याला वैद्यकीय भाषेत ‘शुगर स्पाइक’ म्हणतात. हा स्पाइक केवळ मधुमेहाच्या रुग्णांसाठीच नाही, तर सामान्य व्यक्तींसाठीही अत्यंत घातक ठरू शकतो. यामुळे थकवा येणे, आळस वाढणे आणि वजन वाढणे अशा समस्या निर्माण होतात. सणांचा आनंद कमी न करता आणि मिठायांचा अस्वाद घेत रक्तातील साखरेचा स्पाइक कसा टाळावा हे खालील मुद्द्यांच्या आधारे सोप्या भाषेत समजून घेऊ या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com