Premium|Hybrid education & careers in India : शिक्षणासोबतच कमाई आणि हमखास नोकरी; विद्यार्थ्यांसाठी 'हायब्रीड करिअर मॉडेल' ठरणार गेम चेंजर!

How Apprenticeship Certificates Boost Student Confidence : शिक्षण आणि उद्योगांमधील दरी सांधणारे 'हायब्रीड मॉडेल' विद्यार्थ्यांसाठी कसे गेम चेंजर ठरत आहे आणि एनईपी २०२० च्या माध्यमातून पदवीसोबतच अवाढव्य रोजगार संधी कशा खुल्या होत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा विशेष लेख.
How Apprenticeship Certificates Boost Student Confidence

How Apprenticeship Certificates Boost Student Confidence

esakal

Updated on

डॉ. राजेश बळिराम ओहोळ

रोजगार क्षमता आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हायब्रीड मॉडेल हे एक गेम चेंजर आहे. एईडीपी अप्रेंटिसना मिळणारे विद्यावेतन शिक्षणाचा खर्च भरून काढते. मायक्रो-क्रेडेंशियल्सद्वारे मिळवलेले डिजिटल बॅजेस लिंक्डइनवर व्हिजिबिलिटी आणि मुलाखतीसाठी येणारे कॉल्स वाढवतात. विद्यार्थ्यांना पदवी, मायक्रो-क्रेडेंशियल्स आणि अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र मिळते, सोबतच लॅटरल एंट्रीसाठी आरपीएल क्रेडिट्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यावसायिक नेटवर्क्स मिळतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

भारताच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२०नुसार, हायब्रीड करिअर (संमिश्र करिअर किंवा संमिश्र शैक्षणिक मार्ग) म्हणजे सामान्य शैक्षणिक अभ्यासक्रमाची व्यावसायिक प्रशिक्षण, ऑनलाइन ‘मायक्रो-क्रेडेन्शियल्स’ आणि उद्योगातील प्रत्यक्ष शिकाऊ प्रशिक्षण (Apprenticeships) यांची सांगड होय. विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता उच्च पातळीवर नेणे आणि त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे, हे धोरणामागील उद्दिष्ट आहे.

आयटी सेवा, बँकिंग, विमा, जहाजबांधणी, उत्पादन, ऑटोमोबाईल आणि लॉजिस्टिक्स इत्यादी उद्योग, उमेदवारांना कामावरच प्रशिक्षण देण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याऐवजी, तात्काळ काम करू शकणाऱ्या उमेदवारांना नोकरीवर ठेवण्यास प्राधान्य देतात. या तफावतीमुळे पदवीनंतर फ्रेशर्सना वास्तविक जगातील समस्या सोडवण्याचा अनुभव, साधनांमधील प्रावीण्य आणि आवश्यक सॉफ्ट स्किल्स मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ज्यामुळे नोकरभरतीच्या प्रक्रियेला विलंब होतो आणि विकासाला खीळ बसते.

एनईपी २०२० व्यावहारिक शिक्षण, कौशल्य विकास, क्रेडिट्स फ्लेक्सिबल सिस्टीम आणि डिजिटल प्रगतीचे आश्वासन देते. पण तरीही भारतीय उच्च शिक्षण क्षेत्राला ‘वर्गात काय शिकवले जाते?’ आणि ‘उद्योगाला काय आवश्यक आहे?’ यातील दरी भरून काढण्यासाठी काही नावीन्यपूर्ण मॉडेल्सद्वारे शिक्षण आणि उद्योग यांच्यातील एकात्मिक समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या लेखात एनईपीनुसार, हायब्रीड करिअरचा उद्देश, तरतुदी आणि अपेक्षांवर याची चर्चा केली आहे.

How Apprenticeship Certificates Boost Student Confidence
Premium|Study Room : भारताचा आर्थिक विकास : गेल्या दशकातील कामगिरी, आव्हाने आणि भावी लक्ष्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com