Premium|Hybrid Two-Wheelers India Launch : मायलेजचा जमाना गेला! आता 'मस्क्यूलर' लूक आणि प्रीमियम बाइक्सची भारतीय रस्त्यांवर क्रेझ

Commuter to Premium Bike Shift : भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये आता मायलेजपेक्षा स्टाइल आणि ब्रँडला अधिक महत्त्व मिळत असून, हायब्रिड तंत्रज्ञान आणि प्रीमियम बाइक्सच्या वाढत्या मागणीमुळे दुचाकी आता केवळ प्रवासाचे साधन न राहता जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे.
Hybrid Two-Wheelers India Launch

Hybrid Two-Wheelers India Launch

esakal

Updated on

सागर गिरमे

येत्या काळात हायब्रिड टू-व्हीलर्स येण्याची शक्यता आहे, तसेच प्रीमियम आणि इलेक्ट्रिक असे कॉम्बिनेशन असलेल्या पर्यावरणपूरक आणि स्टायलिश बाइक्स आपल्याला बघायला मिळतील. भारतीय टू-व्हीलर मार्केट हे आता फक्त गरज म्हणून राहिलेले नाही, तर त्याला आता महत्त्वाकांक्षा आणि लाइफस्टाइलचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे कम्यूटर बाइकची गरज कायम राहणार असली, तरी सेकंड व्हेइकल म्हणून प्रीमियम बाइकची मागणीही झपाट्याने वाढत राहणार आहे.

भारतातील टू-व्हीलर बाजारपेठेत मोठा बदल बघायला मिळत आहे. एकेकाळी मायलेज आणि किफायतशीर बाइकला प्राधान्य देणारा ग्राहक आता स्टाइल, ब्रँड, अनुभव आणि ‘मस्क्यूलर’ लुकला महत्त्व देऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत हा बदल अधिक ठळकपणे समोर येत असून, आता हा ट्रेंड कम्यूटर ते प्रीमियम असा बदलताना दिसत आहे.

भारतातील दुचाकी बाजारपेठ जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. दरवर्षी कोट्यवधी वाहनांची विक्री होत असताना या मार्केटचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. काही वर्षांपूर्वी स्प्लेंडर, पॅशन यांसारख्या कम्यूटर बाइक (किफायतशीर प्रवासी दुचाकी) हा सर्वसामान्य ग्राहकांचा पहिला पर्याय होता. मात्र आता ग्राहकांची पसंती बदलताना दिसत आहे. आज ग्राहक रॉयल एन्फील्ड (RE), ट्रायंफ, हार्ले डेव्हिडसन, यामाहा, जावा आणि केटीएम यांसारख्या ब्रँड्सकडे आकर्षित होत आहेत. त्याचे कारण म्हणजे बाइक आता केवळ प्रवास करण्याचे साधन नसून ती लाइफस्टाइल आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग झाली आहे.

Hybrid Two-Wheelers India Launch
Luxury Convertible Cars : लक्झरी कन्व्हर्टेबल कार्स; स्टाइल आणि रोमांचकारी अनुभवाचे प्रतीक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com