Premium|Chess World Cup champion : १९ वर्षीय जावोखिर सिंदारोवचा ऐतिहासिक विजय; सर्वात युवा बुद्धिबळ विश्वकरंडक विजेता

Javokhir Sindarov Chess World Cup winner : उझबेकिस्तानच्या १९ वर्षीय ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव याने गोव्यात झालेल्या बुद्धिबळ विश्वकरंडक स्पर्धेत चिनी ग्रँडमास्टर वेई यीला टायब्रेकरमध्ये पराभूत करून विजेतेपद पटकावले.
Chess World Cup champion

Chess World Cup champion

esakal

Updated on

सिंदारोव उझबेकिस्तानमधील दोनवेळचा राष्ट्रीय विजेता आहे. २०२३मध्ये चेन्नईत झालेल्या ४४व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये विजेतेपद मिळविलेल्या उझबेकिस्तानी संघाचा तो सदस्य होता. २००४मध्ये रुस्तम कासिमझानोव याने जगज्जेतेपद मिळविले होते, त्यानंतर प्रथमच त्या देशातील बुद्धिबळपटूने वैयक्तिक पातळीवर जागतिक स्तरावरील मोठी स्पर्धा जिंकली आहे.

उझबेकिस्तानचा १९ वर्षीय ग्रँडमास्टर जावोखिर सिंदारोव बुद्धिबळ विश्वकरंडकातील नवा विजेता ठरला. गोव्यात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत सिंदारोव याने चिनी ग्रँडमास्टर वेई यी याला टायब्रेकर डावांत पराभूत केले. अंतिम फेरीतील दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमधील दुसऱ्या डावात सिंदारोव वरचढ ठरला. १९ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा असताना बुद्धिबळातील विश्वकरंडक जिंकणारा तो सर्वांत युवा बुद्धिबळ ठरला. यापूर्वी लेव्हॉन अरोनियन याने वयाच्या २३व्या वर्षी ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकली होती. यंदाच्या विश्वकरंडकाचे वैशिष्ट्य म्हणजे, महान भारतीय ग्रँडमास्टर, पाचवेळचा जगज्जेता विश्वनाथन आनंद यांच्या नावे विजेत्याचा करंडक देण्यात आला. स्वतः आनंद यांच्या उपस्थितीत सिंदारोव याने हा शानदार करंडक उंचावला. भारतात २००२नंतर प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन झाले.

Chess World Cup champion
Premium| Women cricket World Cup 2025: भारतीय संघाने रचला इतिहास, पन्नास वर्षांनंतर अनुभवला सुवर्णक्षण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com