Premium|Vozinha World Cup : स्वप्न जगलेला गोलरक्षक

Cape Verde Football : ४० वर्षीय गोलरक्षक व्होझिन्हाने विश्वकरंडक पदार्पणात स्पेनविरुद्ध अभेद्य बचाव करत केप व्हर्देला ऐतिहासिक बरोबरी मिळवून दिली. छोट्या देशाच्या फुटबॉल प्रवासातील हा प्रेरणादायी क्षण ठरला.
Vozinha World Cup

Vozinha World Cup

esakal

Updated on

किशोर पेटकर

वय वाढत होते, त्यामुळे विश्‍वकरंडक खेळण्याची शक्यता कमी झाल्याचे वाटू लागल्यामुळे व्होझिन्हा वर्षभरापूर्वी निवृत्तीच्या विचारात होता. केप व्हर्दे संघात नवा गोलरक्षक ब्रुनो व्हरेला याला संधी देताना व्होझिन्हाला बाहेर ठेवण्यात आले होते. एफकॉन स्पर्धेच्या पात्रता फेरीत केप व्हर्दे संघ अपयशी ठरल्यानंतर पुन्हा एकदा व्होझिन्हाच्या दीर्घानुभवास प्राधान्य मिळाले.

आफ्रिकेच्या पश्‍चिमेकडे मध्य अटलांटिक महासागरात बेटांचा समूह असलेल्या केप व्हर्दे या देशाची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास. या छोट्याशा द्वीपदेशाने विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्यासाठी पात्रता मिळविली, तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आफ्रिकेपुरती ओळख असलेल्या या पूर्वाश्रमीच्या पोर्तुगीज वसाहत देशाने जागतिक फुटबॉलमध्ये पहिल्याच विश्‍वकरंडक सामन्यात थक्क करणारी कामगिरी साधली. माजी विजेत्या आणि यावेळी विजेतेपदासाठी स्पर्धक असलेल्या स्पेनला अटलांटा येथे केप व्हर्देने गोलशून्य बरोबरीत रोखले. पदार्पणातील विश्‍वकरंडक लढतीत गोल न स्वीकारता ऐतिहासिक गुण प्राप्त करणाऱ्या केप व्हर्दे संघाची वाहवा झाली. या शाबासकीचा सूत्रधार अनुभवी गोलरक्षक व्होझिन्हा ठरला. विश्‍वकरंडकातील पहिला सामना खेळला तेव्हा त्याचे वय ४० वर्षे व १२ दिवस इतके होते. स्पेनचे गोलनेटच्या दिशेतील तब्बल सात धोकादायक फटके धैर्याने रोखून त्याने अभेद्य बचाव प्रदर्शित केला. २०१२मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या व्होझिन्हाची वाटचाल मोठी प्रेरणादायक आहे. केप व्हर्देला १९७५मध्ये स्वातंत्र्य मिळाले. एप्रिल १९७८मध्ये हा देश पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळला. हा देश फिफाच्या जागतिक मानांकनात सध्या ६७व्या क्रमांकावर आहे. या देशातील फुटबॉलमधील प्रगतीबरोबर तेथील प्रतिभासंपन्न युवा खेळाडूंनी मोठी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली, व्होझिन्हा हा त्यापैकीच एक.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com