

Indian Stock Market Cycles
esakal
भारतीय शेअर बाजार गेल्या तीन दशकांपासून, एका विशिष्ट आणि अंदाज लावता येणाऱ्या लयीत फिरत आहेत. बाजारात मोठ्या तेजीनंतर तीव्र घसरण आणि त्यानंतर त्याहून मोठी तेजी येते. तरीही, छोट्या गुंतवणूकदारांचे वर्तन क्वचितच बदलले आहे. ते उशिरा बाजारात प्रवेश करतात आणि लवकर बाहेर पडतात. ते मोठ्या संधी गमावतात आणि केवळ तेव्हाच सहभागी होतात, जेव्हा पार्टी संपण्याच्या बेतात असते. यामागे नेमकी काय कारणे आहेत, गुंतवणूकदारांनी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन...
रतीय बाजाराने दीर्घकाळात असामान्य परतावा दिला आहे. १९९५ ते २०२५ या काळात सर्वांत मोठी शोकांतिका ही आहे, की बहुतेक छोट्या गुंतवणूकदारांनी ही संपत्ती कधीच मिळवली नाही. कारण ते नेहमीच चक्राच्या चुकीच्या बाजूला होते. उच्चांकावर खरेदी करत होते आणि नीचांकावर विक्री करत होते.