

Stock Market Fraud Risks
esakal
निरंजन दांडेकर - niranjandandekar2007@gmail.com
गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांची अभूतपूर्व वाढ झाली आहे. डिजिटल क्रांतीमुळे गुंतवणूक करणे सोपे झाले असले, तरी याच संधीचा फायदा घेत फसवणूक करणाऱ्यांनी नवे सापळे तयार केले आहेत. ‘रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न’ दाखवत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडियावरील टिप्स, बनावट ॲप्स, खोटे सल्लागार आणि ‘पंप-अँड-डम्प’सारख्या योजनांमुळे अनेकांची कष्टाची कमाई धोक्यात येत आहे. शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी फक्त ‘मार्केट रिस्क’ नव्हे, तर
गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजारामध्ये ‘रिटेल क्रांती’ पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस आता बँकेतील मुदत ठेवींच्या पलीकडे जाऊन शेअर बाजारात संपत्तीनिर्मितीचे स्वप्न पाहत आहे. डी-मॅट खात्यांची वाढती संख्येवरून हे सहज दिसून येते. डिजिटल क्रांतीमुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणे सोपे झाले असले, तरी याच सोयीचा फायदा घेऊन फसवणुकीचे एक नवे जाळे पसरले आहे.
‘रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न’ हे फसवणूक करणाऱ्यांसाठी (स्कॅमर) सर्वांत मोठे हत्यार ठरत आहे. अनेकदा गुंतवणूकदार अर्धवट माहितीच्या आधारे किंवा सोशल मीडियावरील ‘इन्फ्लुएन्सर्स’च्या झगमगाटात वाहून जातात आणि आयतेच स्कॅमरच्या जाळ्यात अडकतात. रिटेल गुंतवणूकदारांना लक्ष्य करण्यासाठी नवनवीन युक्त्या लढवल्या जात आहेत. कधी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ‘फ्री टिप्स’ दिल्या जातात, तर कधी खोट्या ॲपचा आधार घेतला जातो. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेअर बाजारात पाऊल ठेवण्यापूर्वी ‘मार्केट रिस्क’सोबतच ‘फ्रॉड रिस्क’ समजून घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अशा काही पद्धतींबाबत जाणून घेऊ या.