

Income Tax Return
esakal
भारतीय प्राप्तिकर कायदा हा दरवर्षी अर्थसंकल्पातून प्रकट होतो आणि ‘कर नाही त्याला डर कशाला’ असा आशीर्वादसुद्धा देतो. पण ज्याचे करपात्र उत्पन्न आहे किंवा जो आपले विवरणपत्र (रिटर्न) नियमित भरत नाही, अशा करदात्यांना नोटीस व दंडाचा शापदेखील द्यायला हा कायदा मागे-पुढे बघत नाही. सुधारित विवरणपत्र किंवा आता ‘अपडेटेड रिटर्न’ भरण्याचा उ:शाप करदात्यांना उपलब्ध आहे. त्यामुळे विलंबशुल्क भरून मागील चार वर्षांचे प्राप्तिकराचे विवरणपत्र दाखल करण्याची सुविधा आता उपलब्ध झाली आहे.
Tax is a fine for doing right things and fine is a tax for doing wrong things! असे गंमतीने या कायद्याबाबतीत म्हटले जाते. प्राप्तिकर विवरणपत्र भरायची अंतिम तारीख दरवर्षी ३१ जुलै असताना सरकारने ती अगोदरच १५ सप्टेंबर केली होती आणि करदात्यांना रिटर्न फाईल करायला गरजेचा अवधी मिळाला. शेवटच्या दिवसांत इन्कम टॅक्स पोर्टलने काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे सरकारने आणखी एक दिवसांनी तारीख वाढवली. असे असूनही अजून बऱ्याच करदात्यांनी आपले रिटर्न भरलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांना आपले रिटर्न भरता येईल का? तर याचे उत्तर ‘हो’ असे आहे. फक्त या ‘लाडक्या’ करदात्यांकडून प्राप्तिकर खाते १००० किंवा ५००० रुपयांचा दंड वसूल करेल. वेळ उलटून गेली तरी कोणी कोणी ‘रिटर्न’ भरावा ते आता आपण बघू.