

WWII Movies from Child's Perspective
esakal
अमरूम चित्रपटामध्ये हिटलरभक्त हिटलरच्या बाजूने बोलताना दिसतात, त्याचप्रमाणे हिटलर आणि युद्धविरोधी लोकही दिसतात. ते प्रसंग चित्रपटामध्ये अतिशय संयतपणे आणि तटस्थपणे दाखवले आहेत. युद्धाबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते कशी तयार होतात, त्या मत-मतांतरांचा मुलांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो याचा अनुभव अमरूम चित्रपट देतो...
१९४५ मध्ये, जेव्हा दुसरे महायुद्ध संपुष्टात येत होते, त्या काळात उत्तर जर्मनीमध्ये अमरूम या दुर्गम बेटावर नॅनिंग हा १२ वर्षांचा मुलगा त्याच्या गरोदर आईबरोबर राहात होता. त्याचे वडील युद्धामध्ये व्यग्र होते. मोजकी वस्ती असलेल्या अमरूम बेटावर अन्नसाठा मोजका असल्यामुळे नॅनिंग हा समंजस मुलगा कुटुंब चालवण्यासाठी दिवसा शेती करायचा, रात्री मासेमारी करायचा. त्या निसर्गसौंदर्याने नटलेल्या बेटावर नॅनिंगचे आणि त्याच्या कुटुंबाचे बरे चालले आहे. हाता-तोंडाची गाठ अशा मिळेल त्या अन्नावर होते आहे पण दुसऱ्या महायुद्धामुळे परिस्थिती आणखी बिकट होते. युद्धाचे सावट त्या मुलाच्या दृष्टिकोनातून दाखवणारा ‘अमरूम’ हा जर्मन चित्रपट पुणे फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला होता आणि आता तो चित्रपट प्राइमवर उपलब्ध आहे.