

Milind Shinde Journey
esakal
डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com
सुरुवातीला काही नामदेव ढसाळ यांची भेट झाली नाही, ते त्यांच्या ‘लीट फेस्ट च्या धामधुमीत होते. प्रयोग संपल्यावर माझ्याकडे आले आणि सगळ्यांसमोर मला उचलून मिठी मारली. उंच धिप्पाड ते. त्यांच्या छातीपर्यंतच पोचलो. पोचू शकलो. अजूनही ढसाळांचा विषय आला, की ती ताकद लावलेली बरगड्यांमध्ये रुतलेली आर्द्र मिठी आठवतेच.
नामदेव ढसाळचा फोन येईल तुला. त्याच्याशी बोलून घे. जागतिक साहित्य परिषद घेतोय तो. त्याला ‘झुलवा’ नाटकाचे पाच प्रयोग करायचे आहेत. मी बोललो, ‘तूही बोलून घे. तारखांचा विषय आहे.’
वामनसरांनी एवढं सांगून फोन ठेवला.
नामदेव ढसाळ?
काय बोलायचं काय या माणसाशी?
माझ्यासमोर एकदम शर्टाची दोन वरची बटणं, छातीवरचे पांढरे केस, बुल्गेरियन टाईपची दाढी, हातात सिगारेट असे नामदेव ढसाळ येऊन गेले.
‘तूही यत्ता कंची, गांडू बगीचा ही तरळून गेले.
यांच्याशी बोलायचं कसं? ते आपल्याशी कसं बोलतील?