

Russia-Ukraine Conflict
esakal
डॉ. अमिताभ सिंग - samitabh@gmail.com
रशिया-युक्रन युद्ध तब्बल चार वर्षे सुरू आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेली रक्तरंजित कोंडी लवकर संपण्याची शक्यता दिसत नाही. बड्या देशांची धोरणे बदलत असल्यामुळे निर्णयप्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे. रशिया-युक्रेन यांच्यात विश्वासाचे वातावरण नसल्याचा सर्वात मोठा फटका युद्धबंदीसाठीच्या वाटाघाटींना बसत आहे.
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाने (ज्याचे वर्णन रशियाने विशेष लष्करी मोहीम असे केले होते) चार वर्षे झाल्यानंतर सर्वच अंदाज चुकवले आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी हे युद्ध सुरू झाले तेव्हा ते पंधरवड्यापेक्षा जास्त चालणार नाही, अशी जगाची अपेक्षा होती. मात्र आजही ते सुरूच आहे आणि नजीकच्या भविष्यकाळात ते संपण्याची शक्यता दिसत नाही.