

Modi-Rahul Gandhi Meeting 2026
esakal
सुनील चावके, ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख
देश ज्या अवघड आव्हानांच्या स्थितीतून जात आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील संवादाचे अडथळे दूर झाले असतील तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. ते सामंजस्य टिकायला हवे.
भारताच्या राजकारणात विचारसरणीच्या दोन ध्रुवांवर ठामपणे पाय रोवून असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यामध्ये शनिवारी महात्मा जोतिराव फुले यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभादरम्यान काही सेकंदांची झालेली भेट चर्चेचा विषय ठरली. संवादादरम्यान त्यांची एकमेकांप्रतीची देहबोली नेहमीपेक्षा खूपच आश्वासक दिसली. आज देश ज्या अवघड आव्हानांच्या स्थितीतून जात आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील संवादाचे अडथळे दूर झाले असतील तर ही गोष्ट महत्त्वाची आहे. ते सामंजस्य टिकायला हवे.