
Sustainable finance India
esakal
युगांक गोयल, कृती भार्गव
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक प्रवाह आणि जागतिक धोरणांच्या घडामोडींचा आढावा याच स्तंभातील आधीच्या लेखांमध्ये घेतल्यानंतर आता आपण ‘यूएनसीटीएडी’च्या ‘जागतिक गुंतवणूक अहवाल २०२५’ मधील तिसऱ्या विभागाकडे मी लक्ष वेधू इच्छित आहे. तो जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यामध्ये शाश्वत वित्तीय सद्यःस्थितीबद्दल अर्थात ‘सस्टेनेबल फायनान्स ट्रेंड्स’वर लक्ष केंद्रित केले आहे.
अहवालाच्या या भागात शाश्वत रोखे, ग्रीन फंड्स, कार्बन बाजारपेठा, विविध मानके आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वर्तनातील जागतिक घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे.