Premium|Study Room : युपीआय मध्ये मोठे बदल; पैसे द्यावे लागणार की व्यवहार पूर्वीसारखेच मोफत राहणार?

UPI Charges 2026 : UPI व्यवहारांवरील MDR शुल्काची कायदेशीर बंदी उठवल्यानंतर शुल्काबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, प्रत्येक UPI व्यवहारासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जातील, असा निर्णय अद्याप झालेला नाही.
UPI Charges 2026

UPI Charges 2026

esakal

Updated on

सकाळचा चहा असो, मंडईतली भाजी असो वा दुकानातून आणलेला महिनाभराचा किराणा, आजकाल आपण खिशात पैशांचे पाकीट ठेवणे जवळपास विसरूनच गेलो आहोत. 'भैय्या, क्यूआर कोड कुठे आहे?' हा प्रश्न आता आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. एकेकाळी केवळ एक तांत्रिक प्रयोग म्हणून सुरू झालेल्या 'युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस' (UPI) ने आज देशात डिजिटल क्रांती घडवून आणली आहे.

पण, ऑगस्ट २०२६ मध्ये लोकसभेत मंजूर झालेले एक नवे विधेयक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे सध्या सर्वसामान्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, 'आता UPI वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार का?' सोशल मीडियावरून अनेक गैरसमज पसरत आहेत. हे नवीन बदल नेमके काय आहेत, ते का केले जात आहेत आणि खरोखरच तुमच्या-आमच्या खिशाला याची झळ बसणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आणि या बदलांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम समजून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com