Chess : आई-वडील विरंगुळ्यासाठी खेळायचे बुद्धिबळ, मुलाने त्यातच देशासाठी पदक कमावले; गुकेशची यशोगाथा

वयाच्या सातव्या वर्षी त्याने बुद्धिबळाच्या स्पर्धेत जेतेपद पटकावलं आणि विरंगुळ्यासाठी असलेलं बुद्धिबळ घरात केंद्रस्थानी आलं..
D gukesh chess player
D gukesh chess playerEsakal

चेन्नई : चेन्नईत राहणारे डॉ. रजनीकांथ हे कान-नाक-घसा तज्ज्ञ, तर त्यांची पत्नी डॉ. पद्मकुमारी या मायक्रोबायोलॉजिस्ट... करिअर आणि संसार यातून मिळालेल्या फावल्या वेळेत दोघं बुद्धिबळ खेळायचे... आई-वडिलांच्या या छंदातूनच मुलाची बुद्धिबळाशी ओळख झाली.. वयाच्या सातव्या वर्षी त्याने बुद्धिबळाच्या स्पर्धेत जेतेपद पटकावलं आणि विरंगुळ्यासाठी असलेलं बुद्धिबळ घरात केंद्रस्थानी आले.

सोमवारी याच मुलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास रचला आहे. डी. गुकेश असं या १७ वर्षांच्या तरुणाचे नाव असून आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने भारताचा झेंडा रोवला आहे. जागतिक स्पर्धेत आव्हानवीर असलेला तो सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com