Premium|Study Room : भारतासह जगभरात वाढते वनाग्नीचे संकट: कारणे, परिणाम आणि एकात्मिक अग्निव्यवस्थापनाची गरज

Wildfire Causes and Effects : वनाग्नीचा धोका वाढण्यामागे हवामान बदल, मानवी हस्तक्षेप आणि कोरडी वनस्पती कारणीभूत ठरतात. वनाग्नीमुळे पर्यावरण, जैवविविधता, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर होणारे गंभीर परिणाम समजून घेऊया.
Wildfire Causes and Effects

Wildfire Causes and Effects

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

वनाग्नी (Wildfire) म्हणजे जंगल, गवताळ प्रदेश, झुडपी प्रदेश किंवा टुंड्रा प्रदेशात लागलेली अनियंत्रित आग होय. वारा आणि भूप्रदेशाच्या स्वरूपामुळे वनाग्नी वेगाने पसरतो. आग टिकून राहण्यासाठी इंधन, ऑक्सिजन आणि उष्णता हे तीन मूलभूत घटक आवश्यक असतात. भूपृष्ठीय आग जंगलाच्या जमिनीवरील सुकलेली पाने, लहान फांद्या व गवत जाळते. भूमिगत आग जमिनीखालील सेंद्रिय पदार्थांमध्ये कमी तीव्रतेने पसरते आणि अनेकदा अनेक महिने टिकू शकते.

वनाग्नी निर्माण होण्यामागे भौगोलिक, हवामानविषयक आणि मानवी घटक महत्त्वाचे आहेत. भूमध्यसागरीय हवामान असलेले प्रदेश वनाग्नीसाठी विशेषतः संवेदनशील असतात. उन्हाळ्यातील उच्च तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे यामुळे वनस्पती कोरड्या होतात व आग वेगाने पसरते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com