Home Loan : टेंन्शन मत ले यार; होम लोन कमी काळात फेडण्याची सोप्पी ट्रिक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Loan

Home Loan : टेंन्शन मत ले यार; होम लोन कमी काळात फेडण्याची सोप्पी ट्रिक!

डोक्यावर कर्ज असेल तर किती मोठं ओझं असल्याचं फिलिंग असतं याची कल्पना सर्वांनाच आहे. कारण,  कोणत्या ना कोणत्या कर्जाचे हफ्ते आपण महिन्याला भरत आहोत. त्याची जाणिव ठेवूनच आपण महिन्याच्या खर्चाची आखणी करत असतो.

काहीवेळा हफ्ता भरला जाईल की नाही, याचे टेंशन असल्याने लोक आत्महत्येचा विचारही करतात. मात्र, एका साध्या सोप्या ट्रिकने तूम्ही २० वर्षाचे कर्ज दहा वर्षात फेडू शकता. काळजी करू नका यासाठी काही कोणत्या बॅंकेवर दरोडा घालण्याची नाही तर, केवळ एक सोपी आयडीया वापरण्याची गरज आहे.

होम लोन लवकरात लवकर परतफेड करण्यासाठी दरवर्षी जास्तीचा एक ईएमआय भरू शकता. तूम्ही दर वर्षी फक्त एक ईएमआय जास्तीचा भरल्यास २० वर्षांत मूळ कर्जासोबत १८.२४ लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील.

दरवर्षी जास्तीचा एक ईएमआय भरल्यास त्याचा ईएमआय २४० महिन्यांवरून २०७ महिन्यांवर येईल. अशाप्रकारे होम लोनची परतफेड ३३ महिने लवकर पूर्ण होईल, सोबतच २.५५ लाख रुपये व्याजाची रक्कम वाचेल.

दुसरी ट्रिक म्हणजे, तूम्हाला शक्य असेल तर ईएमआयचा हप्ता वाढवून घ्यावा. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला इएमआय १० टक्क्यांनी वाढवल्यास पूर्ण कर्जाची परतफेड १० वर्षातच म्हणजेच ११८ महिन्यातच पूर्ण होईल. अशाप्रकारे एकूण केवळ ९.९६ लाख रुपयांचं व्याज भरावं लागेल. त्यामुळे तुमची तब्बल ८.४६ लाख रुपयांच्या व्याजाची रक्कम वाचणार आहे.

वेळोवेळी काही ठराविक रक्कम प्रीमेंट केल्यासही होमलोनची परतफेड लवकर होते. यासाठी बोनस किंवा एरिअर्सच्या रुपानं मिळालेल्या रकमेचा तुम्ही वापर करू शकता.

नातेवाईक आणि मित्रांकडून पैशांच्या स्वरुपात मिळालेली भेट, एफडी किंवा शेअर्समधून मिळालेलेलं उत्पन्न, एखादी संपत्ती विकली असल्यास किंवा टॅक्स सेव्हिंग बचतीमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर तुम्ही प्रीमेंटसाठी करू शकता.