आठवीचा 'तो' वादाग्रस्त पाठ पाठ्यक्रमातून वगळला

मीनाक्षी गुरव
Sunday, 26 July 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा ऑनलाईन, टीव्हीच्या माध्यमातून सुरू आहेत. अशात विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता पहिले ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी घोषणा केली. तसेच कमी झालेल्या अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील यदुनाथ थत्ते लिखित 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' हा वादग्रस्त पाठ कमी केलेल्या अभ्यासक्रमातून पूर्णपणे वगळण्यात आला आहे. इयत्ता पहिले ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केलेल्या अभ्यासक्रमात याबाबत तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांना या वादग्रस्त पाठाचा अभ्यास करावा लागणार नाही, हे निश्चित झाले आहे.
 
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शाळा ऑनलाईन, टीव्हीच्या माध्यमातून सुरू आहेत. अशात विद्यार्थ्यांच्या मनावरील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता पहिले ते बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी घोषणा केली. तसेच कमी झालेल्या अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दरम्यान, इयत्ता आठवीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील यदुनाथ थत्ते लिखित 'माझ्या देशावर माझे प्रेम आहे' हा पाठ पूर्णपणे वगळण्यात आला आहे. या पाठात भगतसिंग, राजगुरू यांच्याबरोबर कुर्बान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. या पाठात सुखदेव यांचे नाव हेतुपुरस्कर वगळण्यात आल्याचा आक्षेप काही संघटनांनी केला होता. त्यावर राज्य परिषदेने खुलासाही केला. मात्र शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच या पाठाच्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही पाठ्यपुस्तके वादाच्या भोवऱ्यात सापडली. परंतु हा वादग्रस्त पाठ यंदाच्या कमी केलेल्या पाठ्यक्रमातून वगळण्यात आला आहे. 

पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा पैशांसाठी छळ तर तिसरीला
 
३३ लाख जणांनी कमी झालेला पाठ्यकर केला डाऊनलोड

शिक्षण विभागाने इयत्ता पहिले ते बारावीचा २५ टक्के कमी केलेला अभ्यासक्रम "www.maa.ac.in" आणि "www.ebalbharati.in" या संकेतस्थळावर शनिवारपासून उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम आतापर्यंत जवळपास ३३ लाख एक हजार १३४ जणांनी डाऊनलोड केला असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: controversial lesson was omitted from the syllabus of the eighth standard