esakal | वरंध घाट छोट्या वाहनांसाठी लवकरच खुला होणार; पुण्याच्या चाकरमान्यांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार भरत गोगावले वरंध घाटाची पाहणी करताना

वरंध घाटाचा रस्ता गुरुवारी खचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. या घाटाची पाहणी शनिवारी (ता. 15) महाडचे आमदार भरत गोगावले यांनी केली. या दरम्यान त्यांनी महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध घाटांमधून कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यासाठी त्यांनी अडथळे दूर करून रस्ता छोट्या वाहनांसाठी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वरंध घाट छोट्या वाहनांसाठी लवकरच खुला होणार; पुण्याच्या चाकरमान्यांना दिलासा

sakal_logo
By
सुनील पाटकर

महाड : वरंध घाटाचा रस्ता गुरुवारी खचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली होती. या घाटाची पाहणी शनिवारी (ता. 15) महाडचे आमदार भरत गोगावले यांनी केली. या दरम्यान त्यांनी महाड-पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध घाटांमधून कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यासाठी त्यांनी अडथळे दूर करून रस्ता छोट्या वाहनांसाठी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

वरंध घाटांमधील माझेरी गावाच्या नजीक सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटामध्ये रस्ता खचला आहे. याशिवाय, संरक्षक भिंत कोसळल्याने घाट रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यातून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. 

हेही वाचा : सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

याची दखल घेत गोगावले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व स्थानिक ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासमवेत वरंध घाटांमधील परिस्थितीची पाहणी केली. रस्त्यातील अडथळे दूर करून हा रस्ता छोट्या वाहनांसाठी सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या महाड कार्यकारी अभियंतांना दिल्या आहेत. 

घाट रस्त्यावर नैसर्गिक पाण्याचा निचरा होत नसल्याने नादुरुस्त झाला आहे. मोबाईल केबल टाकल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याचे आमदार गोगावले यांनी वरंध घाटाच्या पाहणी दौऱ्यानंतर स्पष्ट केले. 

मोठी बातमी : जुन्या कपड्यांनी उलगडला कोट्यधींचा कर गैरव्यवहार; बोगस कोडवरून चढ्या भावाने निर्यात

ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल 
अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, संरक्षक भिंतींची पडझड होणे या घटनांमुळे पुणे जिल्ह्यातून कोकणामध्ये दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची; तसेच व्यापाऱ्यांची गैरसोय होत असते. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आल्याने ही समस्या येणाऱ्या काळात कायमस्वरूपी मार्गी लागेल, अशी माहिती आमदार गोगावले यांनी दिली. 

(संपादन : उमा शिंदे)