Pune : रस्ता खोदल्याने एक कोटीचा दंड

एक मे पासून शहरात रस्ते खोदाई बंद झाली आहे. पाणी पुरवठा व सांडपाणी वाहिनी यासह इतर अत्यावश्यक कामांसाठी खोदाईची परवानगी दिली
1 crore fine for digging road electric internet cable pune constrction
1 crore fine for digging road electric internet cable pune constrctionesakal

पुणे : पावसाळा जवळ आल्याने महापालिकेने रस्ते खोदाई बंद करून रस्ते दुरूस्तीवर भर दिलेला असताना बांधकाम व्यावसायिक, खासगी ठेकेदारांकडून परस्पर रस्ते खोदाई केल्याचे प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांना ९२ लाख रुपयांचा दंड केला आहे.

1 crore fine for digging road electric internet cable pune constrction
Pune Crime : ‘त्या’ तोतया पत्रकारांनी बिल्डरकडे मागितली दोन फ्लॅटसह ५० लाखांची खंडणी

महापालिकेतर्फे १ आॅक्टोबर ते ३० एप्रिल या कालवधीमध्ये जलवाहिनी, मल वाहिनी, गॅस वाहिनी, विद्युत वाहिनी, मोबाईल व इंटरनेट नेटवर्कसाठी केबल टाकण्यासाठी रस्ते खोदाईसाठी परवानगी दिली जाते.

यासाठी खासगी कंपनीकडून १२ हजार १९२ रुपये प्रति मिटर तर महावितरणच्या विद्युत वाहिनीसाठी २ हजार ३५० रुपये प्रति मीटर शुल्क घेतले आहे. महापालिकेला या शुल्कातून दरवर्षी किमान २५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातून जे रस्ते खोदलेले आहेत, तेथे दुरुस्ती केली जाते.

1 crore fine for digging road electric internet cable pune constrction
Pune Crime : ‘त्या’ तोतया पत्रकारांनी बिल्डरकडे मागितली दोन फ्लॅटसह ५० लाखांची खंडणी

एक मे पासून शहरात रस्ते खोदाई बंद झाली आहे. पाणी पुरवठा व सांडपाणी वाहिनी यासह इतर अत्यावश्यक कामांसाठी खोदाईची परवानगी दिली जाते. असे असताना शहरात बांधकाम व्यावसायिक, खासगी ठेकेदार, मोबाईल कंपन्या रस्ते खोदत असल्याचे समोर आले आहे. अशांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.

औंध डिमार्ट येथे एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ते खोदाई केल्याप्रकरणी ४१ लाख ६९ हजाराचा दंड केला आहे. तर वडगावशेरी येथील खोदाईप्रकरणी एका खासगी ठेकेदाराला ५१ लाखाचा दंड केला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी यांनी दिली.

1 crore fine for digging road electric internet cable pune constrction
Mumbai: सामाजिक संवेदनाला आत्मियतेची जोड

फक्त तक्रार दंड नाही

सॅलिसबरी पार्क येथे एका मोबाईल कंपनीकडून केबल टाकली जात होती, याप्रकरणी कंपनीला दंड करणे अपेक्षीत होते. पण दंड न करता केवळ स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.दंड का केला नाही याबाबत अधिकाऱ्यांनी उत्तर देणे टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com