Pune News : पुण्यात ATSची मोठी कारवाई; नारायणगावातून ७ बांग्लादेशी घुसखोर अटकेत

दहशतवाद विरोधी पथकाची नारायणगावात कारवाई: घुसखोरी केलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल: सात जणांना अटक
arrest
arrestesakal

Pune News : दहशतवाद विरोधी पथक( एटीएस), पुणे युनिट व नारायणगाव पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून अवैधरित्या नारायणगाव(ता. जुन्नर ) येथे वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरीकांवर गुन्हा दाखल केला आहे.

यापैकी सात जणांना अटक केली आहे.एक आरोपी फरार झाला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, फौजदार व्ही. व्ही. धुर्वे यांनी दिली.

या प्रकरणी मेहबुल नजरून शेख,राणा जमातअली मंडल,गफुर राजेबाली शेख,आलमगीर जमातअली मंडल, शालोम मुस्तफीजुर मंडल,अफजल हमिबुल खान, कबीर मुज्जाम मुल्ला (सध्या सर्व राहणार नारायणगाव, ता. जुन्नर, मुळ बांगलादेश) यांना अटक करण्यात आली असून जमातअली व्हायतअली मंडल हा फरार झाला आहे.

arrest
Weather Update : येत्या ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, काही ठिकाणी गारपीट; शेतकऱ्यांची चिंता वाढली

कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रा शिवाय तसेच भारत बांग्लादेश सिमेवरील मुलकी आधिका-यांच्या लेखी परररवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून बांगलादेशी नागरिक अवैधरित्या नारायणगाव परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पुणे येथील दहशतवाद विरोधी ( एटीएस) पथकाला मिळाली होती.

या पथकाने नारायणगाव पोलिसांच्या मदतीने गुरुवारी (ता.14) नारायणगाव परिसरात छापेमारी करून मेहबुल नजरून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इतर सहा जणांना ताब्यात घेतले.

arrest
Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी प्रकरणाच्या मास्टरमाइंडचे TMC सोबत कनेक्शन? भाजपने शेअर केला फोटो

दरम्यान एक बांगलादेशी नागरिक फरार झाला. अटक करण्यात आलेल्या सात जणांना पुढील तपासासाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस तपासात अटक आरोपींकडे आधार कार्ड आढळून आले आहे.

ही आधार कार्ड आरोपींनी नारायणगाव ग्रामपंचायत कडून रहिवासी दाखला घेऊन काढली असल्याचा जबाब आरोपींनी दिला आहे. त्या दृष्टीने नारायणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.परकीय नागरीक कायदा १९४६ कलम १४, पारपत्र अधिनियम १९६७ - नियम ३, ६, पारपत्र (भारतात प्रवेश) परकीय नागरीक आदेश १९५० चे कलम ३ (अ) अन्वये आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार यांनी दिली.

आरोपींची नावे मतदार यादीत: अटक आरोपी पैकी

मेहबुल नजरून शेख,राणा जमातअली मंडल,गफुर राजेबाली शेख,कबीर मुज्जाम मुल्ला या चार आरोपींची नावे प्राथमिक चौकशीत नारायणगाव मतदार यादीत दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक आरोपींना आधार कार्ड काढून देण्यास कोणी मदत केली. त्यांची पुरवणी मतदार यादीत नावे कशी आली. याची चौकशी करण्याची मागणी नारायणगाव ग्रामस्थांनी केली आहे.

मतदार यादीवर आक्षेप: नारायणगाव ग्रामपंचायतची नुकतीच निवडणूक झाली. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी पुरवणी मतदार यादीत दाखल करण्यात आलेल्या मतदारांच्या नावा विषयी आक्षेप घेऊन ही नावे मतदार यादीतून कमी करावीत.अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

arrest
Pune News : पुण्यात ATSची मोठी कारवाई; नारायणगावातून १० बांग्लादेशी घुसखोर अटकेत

नारायणगावात मोठ्या संख्येने बांगलादेशी राहात असल्याचा ग्रामस्थांना संशय आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड काढून शासनाच्या योजनेनुसार मजूर म्हणून नोंदणी केली गेली. हे बांगलादेशी नागरिक शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ घेत आहेत.

महादेव शेलार( सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव): ज्या मालकांनी आपली मालमत्ता,घरे, फ्लॅट भाड्याने दिले आहेत. संबंधितांनी नोंदणी केलेले भाडेकरार नारायणगाव पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. भाडेकरार न करताच भाडेकरू ठेवला असल्याचे आढळून आल्यास संबंधित जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com