इंदापूरकरांच्या चिंतेत झाली वाढ; 10 जण नवीन कोरोना बाधित तर आजपर्यत 4 रुग्णांचा मृत्यू

डॉ. संदेश शहा
Monday, 13 July 2020

इंदापूर शहर व तालुक्यात दि. 13 जुलै रोजी 10 जण कोरोना बाधित निघाल्याने इंदापूर तालुक्यात एकूण कोरोना रुग्णाची आजपर्यंतची संख्या 60 झाली आहे. तर आजपर्यत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.

इंदापूर - इंदापूर शहर व तालुक्यात दि. 13 जुलै रोजी 10 जण कोरोना बाधित निघाल्याने इंदापूर तालुक्यात एकूण कोरोना रुग्णाची आजपर्यंतची संख्या 60 झाली आहे. तर आजपर्यत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंदापूर तालुक्यातील 42 संशयित रुग्णांच्या घश्यातील स्त्रावाच्या नमुन्यांची कोरोनाचाचणी करण्यात आली होती. पैकी 10 जणांचा अहवाल कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्याने इंदापूर करांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा चालक, भिगवण येथील महिलेच्या थेट संपर्कात आलेले तीन जण, महसूल खात्यातील एक मंडळ कृषीअधिकारी, अकोले येथील एक रुग्णासह इंदापुरातील पाच जणांचा समावेश समावेश आहे.

'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत!

इंदापूर शहरातील दत्तनगर येथील 3 तर कुरेशीगल्ली तील दोन रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. इंदापूर शहर व तालुक्यात लागण झालेल्या एकूण 60 रुग्णांपैकी 36 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 20 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये बारामती येथे 4, इंदापूर कोविड केअर केंद्रात 14 तर पुणे येथे दोन जणांवर उपचार सुरू आहेत.

Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण?

दरम्यान, नागरिकांनी घरी थांबून सुरक्षित रहावे, शासन निर्देशांचे पालन करावे, घाबरून न जाता योग्य दक्षता घ्यावी, फ्ल्यू सारखी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन सामान्यप्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे.

Edited By - Prashant Patil

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 new Corona patient Increase in indapur