11 Th Admission : पहिल्या नियमित फेरीतील विद्यार्थ्यांना सोमवारपर्यंत प्रवेश घेता येणार

इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया
11 Th Admission
11 Th Admissionsakal

11 Th Admission - इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या नियमित फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता सोमवारपर्यंत (ता.२६) प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थी-पालकांच्या मागणीनुसार या फेरीत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. सोमवारी दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात येणार आहे.

11 Th Admission
Mumbai : एससीएलआर विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टळणार; स्टेड केबल पूल उभारणीला वेग

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील ३४२ कनिष्ठ महाविद्यालयांमधील ८८ हजार ५२६ ‘कॅप’अंतर्गत जागांवरील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पहिल्या नियमित यादीत ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये देण्यात आली होती. त्यातील आतापर्यंत केवळ २३ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार,‘प्रवेशाच्या पहिल्या नियमित फेरीत विद्यार्थी, पालक आणि  काही कनिष्ठ महाविद्यालये यांच्या मागणीनुसार, तसेच फेरीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होण्याकरिता या फेरीत सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत दिली आहे.

11 Th Admission
Mumbai : एससीएलआर विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टळणार; स्टेड केबल पूल उभारणीला वेग

इन्फोबॉक्स -

पहिल्या नियमित फेरीत प्राधान्यक्रमानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :

प्राधान्यक्रम : प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी : प्रवेश घेतलेले विद्यार्थी

१ : २३,३५१ : १८,०९१

२ : ६,९७५ : २,८२९

३ : ३,८९७ : १,२११

४ : २,४१२ : ५२६

५ : १,८२३ : ३२२

६ : १,२९० : २०८

७ : ९५० : ११२

८ : ६७९ : ७३

९ : ४८१: ५३

१० : ३८१ : ४९

11 Th Admission
Mumbai : एससीएलआर विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टळणार; स्टेड केबल पूल उभारणीला वेग

पहिल्या नियमित फेरीतील तपशील :

उपलब्ध जागा : ८८,५२६

पात्र विद्यार्थी : ६३,४४२

प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी : ४२,२३९

प्रवेश घेतलेले : २२,७१४

प्रवेश नाकारलेले : ६९

प्रवेश रद्द केलेले : ९०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com