Pune News : ससूनमधील १२ कैद्यांची येरवडा कारागृहात रवानगी

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
12 prisoners from Sassoon sent to Yerwada Jail pune news marathi news
12 prisoners from Sassoon sent to Yerwada Jail pune news marathi newssakal

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात उपचारांची आवश्यकता नसलेल्या १२ कैद्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील दुर्घटना आणि ससून रुग्णालयातून ललित पाटील या कैद्याने पलायन केल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी ससून रुग्णालयाचा आढावा घेतला होता. या वेळी विभागीय आयुक्त राव यांनी रुग्णालयातील विविध सेवा आणि कैद्यांच्या कक्षांचा आढावा असे दोन स्वतंत्र अहवाल देण्याचे आदेश ससून प्रशासनाला दिले होते.

ससून रुग्णालय प्रशासनाने शनिवारी (ता. ७) आरोग्य सेवा, मनुष्यबळ, औषधे पुरवठा याबाबतचा अहवाल सादर केला. त्यानुसार ससूनमध्ये शुक्रवारपर्यंत १६ कैद्यांवर उपचार सुरू होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात केवळ चार कैद्यांनाच वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या चार कैद्यांना वगळून उर्वरित १२ कैद्यांची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com