पुणे : ...अन् मामासमोरच भाच्याने सोडला जीव

A 14 year old boy dies on the spot in a bus accident in  pune
A 14 year old boy dies on the spot in a bus accident in pune

पुणे : मामाकडे शिक्षण घेण्यासाठी आलेला चौदा वर्षाचा मुलगा मामासमवेत दुचाकीवर पाठीमागे बसून जाताना भरधाव पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात बसचे चाक मुलाच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडे चार वाजता हडपसर येथे शेवाळवाडी फाट्याजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी पीएमपी बस चालकास अटक केली. 

अजय नामदेव राठोड (वय 14, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी) असे अपघाती मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अनिल आडे (रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली जि. पुणे) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पीएमपी चालक मेहबुब अकबर सैय्यद (वय 38, रा. वडगाव-रसाई, हवेली) यास अटक करण्यात आला.

Video : चक्क! कांदा लसुणच्या सालींपासून साकारली सुरेख चित्रे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा अजय राठोड हा मुळचा परभणी येथील आहे. तो शिक्षण घेण्यासाठी त्याचा मामा फिर्यादी आडे यांच्याकडे आला होता. तो भेकराईनगर येथील शाळेमध्ये सातवीत शिक्षण घेत होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी अजय मामासमवेत दुचाकीवर पाठीमागे बसून लोणी येथून हडपसरच्या दिशेने येत होता. सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी फाट्यापासून पुढे जात होते. जय भवानी ट्रेडर्स  अॅण्ड हार्ड वेअर दुकानजवळ आले त्यावेळी भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यावेळी अजय रस्त्याच्या उजव्या बाजुला पडला, तर फिर्यादी रस्त्याच्या डाव्या बाजुला पडले. त्यावेळी बसच्या मागील चाकाखाली आला. त्याच्या अंगावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दोघांनीही हेल्मेट घातले नव्हते. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा बांबे करीत आहेत. 

Video : पुण्यात रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; अभिजित, बाला रफिक मैदानात उतरणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com