
पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गटविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणीचा पल्ला पूर्ण केला असून कटके व बाला रफिक दोघेही डबल केसरी किताबासाठी मेहनत घेत आहे.
Video : पुण्यात आजपासून महाराष्ट्र केसरीचा थरार; अभिजित, बाला रफिक मैदानात उतरणार
पुणे : महाराष्ट्रात सर्वात मानाची मानली जाणारी 'महाराष्ट्र केसरी स्पर्धा'साठी पुणे सज्ज होत आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गटविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणीचा पल्ला पूर्ण केला असून कटके व बाला रफिक दोघेही डबल केसरी किताबासाठी मेहनत घेत आहे.
हार्दिक-नताशाच्या हॉट फोटोवर विराट म्हणाला...
'महाराष्ट्र केसरी स्पर्धा दहा वजनी गटात होणार असून यामध्ये प्रत्येक गटात माती आणि मॅट अशी वर्गवारी केली जाणार आहे. यापैकी 86 ते 125 वजनगटातील माती आणि मॅट गटाच्या विजेत्या पेहलवानांमध्ये महाराष्ट्र कुस्ती किताबाची कुस्ती खेळवण्यात येणार आहे. आज कमी गटातील वजन होणार आहेत तर उद्या महाकेसरी वजन होतील.
भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या 'या' खेळाडूवर एका वर्षाची बंदी
दरम्यान, तालुका तसेच जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचा आखाडा महाराष्ट्रात सर्वत्रच भरला आहे. पुण्यातील स्पर्धेत 900 ते 950 मल्ल सहभागी होणार असून खाजगी बांधकाम व्यवसायिकांद्वारे प्रथमच ही स्पर्धा होत आहे. पुण्यातील स्पर्धेत 44 संघ सहभागी होणार असून स्पर्धेच्या तयारी सुरू झाली आहे.
हार्दिकनं दिली प्रेमाची कबूली, बघा त्याची हॉट गर्लफ्रेंड
महाकेसरी अभिजित कटके पुन्हा रिंगणात उतरला आहे. उद्या(ता.3) गदा पूजन होणार असून परवापासून(ता.4) कुस्त्यांना सुरवात होईल. त्यामुळे यावर्षीचा 'महाकेसरी' कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video : क्रिकेट खेळण्याची त्याची जिद्द बघून सचिन झाला भावूक!
पुण्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेची पुण्यातून निवड झाली आहे. गादी विभागातून कटके यांनी विजय मिळवल्याने सलग चौथ्यांदा त्याचा महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात शड्डू ठोकण्याचा मार्ग खुला झाला आहे. अभिजित कटके याने महाराष्ट्र केसरीच्या सलग तीन स्पर्धेत फायनलपर्यंत मजल मारली आहे. विजय चौधरी, बाला रफिक यांच्यासोबत त्यांची फायनलला लढत झाली होती. त्यात त्याला उपमहाराष्ट्र केसरी पद मिळाले. किरण भगत याच्यासोबत झालेल्या लढतीत किरणवर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली.एक वेळा महाराष्ट्र केसरी आणि दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरीचा मान त्याने मिळवला आहे. पुण्यातून झालेल्या चाचणी स्पर्धेत गादी गटातून त्याची महाराष्ट्र केसरीसाठी निवड झाल्याने सलग चौथ्यांदा तो आखाड्यात उतरत आहे.
मँचेस्टर युनायटेडला वर्षाच्या सुरवातीलाच धक्का; आर्सेनलकडून पराभव