15 वर्षे स्त्री म्हणून जगली, आता कळलं पुरुष आहे

15 year old girl finds she is a male surgery in Pune to remain as woman
15 year old girl finds she is a male surgery in Pune to remain as woman

पुणे :  मासिक पाळी येत नसल्याने सातारा येथील एक 15 वर्षीय तरुणी उपचार घेण्यासाठी पुण्यात आली. डॉक्टरांनी तिच्या तपासण्या केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. ही तरुणी शरीराने मुलगी असली तरी गुणसुत्रांनी पुरुष असल्याची माहिती या चाचणीतून समजली.

Androgen insensitivity syndrome (एआयएस) नावाचा दुर्मिळ आजार तिला असल्याचे डॉक्टरांनी निदान केले आहे.  या आजारात व्यक्ती अनुवांशिकरित्या पुरुष म्हणून जन्माला आला असला तरी त्यांच्यामध्ये महिलांची वैशिष्ट्ये असतात. आता या तरुणीला तिची खरी ओळख समल्यानंतर तिला आणि तिच्या पालकांना तिचे पुढील आयुष्य स्त्री म्हणूनच जगायचे आहे. 

काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला; 4 जवान जखमी

रूबी हॉल क्लिनिकचे स्त्रीरोग तज्ञ आणि एंडोस्कोपिक सर्जन मनीष माचावे, यांना या तरुणीवर उपचार करताना तिला एआयएस नावाचा आजार असल्याचे निदान झाले.  ते म्हणाले की, या तरुणीला पार्शिअल एआयएस हा आजार आहे. अ‍ॅन्ड्रोजन हे पुरुष हॉर्मोन आहे. अशा व्यक्तीमध्ये शरीर पुरुष हॉर्मोनसाठी असंवेदनशील बनते. पार्शिअल एआयएस  असलेल्या व्यक्तींमध्ये स्त्री आणि पुरुष अशी मिश्र वैशिष्ट्ये आढळू शकतात. या प्रकरणात, तिच्या ब्रेस्टचा विकास झाला नाही. तसेच तिच्या योनीचा विकास देखील सर्वसामान्य रितीने होत नाही. तिला गर्भाशय आणि अंडाशय नाही.''

या तरुणीला स्त्री म्हणून आयुष्य जगात यावे यासाठी येथील डॉक्टरांची टीम काम करत आहे. नुकतीच तिची शस्त्रक्रिया करुन अंडकोष काढले आहे. तसेच स्तन वृद्धिंगतीसाठी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तिला हार्मोनल इंजेक्शन देण्याची योजना आखली असून त्यामुळे जे पुरुषी वैशिष्ट्यांचा विकास रोखण्यास मदत होईल.

डॉक्टर म्हणाले की, एकदा ती 18 वर्षांची झाली की  laparoscopic vaginoplasty (शल्यक्रियतून योनीची निर्मिती) करतात. या शस्त्रक्रियेनंतर ती एक स्त्री म्हणून सामान्य जीवन जगू शकेल. परंतु गर्भाशय किंवा अंडाशय नसल्यामुळे ती गर्भधारणा करू शकत नाही आणि तिला मासिक पाळी येणार नाही. 

या तरुणीवर झालेल्या शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉक्टर म्हणाले की, या तरुणीला ओटीपोटात आणि जांघेत असामान्य ठिकाणी अंडकोषाची निर्मिती झाली होती. त्यामुळे तिला Gonadoblastoma नावाचा कर्करोग होण्याचा धोका होता. म्हणूनच, आम्ही तीन महिन्यांपूर्वी सर्वात प्रथम  laparoscopic gonadectomy  करुन दोन्ही बाजूंकडील अंडकोष काढून टाकले.

रुबी हॉल क्लिनिकमधील स्तन सर्जन अनुपमा माने यांनी10 दिवसांपूर्वी या तरुणीवर स्तन वाढीची शस्त्रक्रिया केली. त्या म्हणाल्या, ''ही जन्मल्यापासून मुलगी म्हणून वाढली आणि म्हणूनच तिला तशीच राहायची इच्छा होती. आम्ही तिच्यासाठी स्तन वाढीची शस्त्रक्रिया केली. पुरुषांसारखी होणारी केसांची वाढ थांबविण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन आवश्यक आहे. स्त्री म्हणून तिचे परिवर्तन पूर्ण करण्यासाठी आम्ही तिला मदत करीत आहोत. यासाठी तिच्यावर वर्षानुवर्षे उपचार चालू राहतील. AIS हा अनुवांशिकरित्या होणारा आजार आहे. वैद्यकीय शास्त्रात सांगितल्याप्रमाणे दर 4 लाख व्यक्तींपैकी 4 व्यक्तींना या आजाराने ग्रस्त असतात.  खूप कमी लोक या आजारावर वैद्यकीय उपचारासाठी पुढे येतात.''

farmer protest: दिल्ली हिंसाचारप्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com