फेम-2 अंतर्गत दिडशे ईबस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 31 December 2020

केंद्र सरकारच्या फेम- 2 या योजनेतंर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) वतीने 150 ई-बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. या योजनेतंर्गत प्रति ई-बस 55 लाख रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून कंत्राटदार कंपनीला मिळणार आहे.

पुणे - केंद्र सरकारच्या फेम- 2 या योजनेतंर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) वतीने 150 ई-बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. या योजनेतंर्गत प्रति ई-बस 55 लाख रुपयांचे अनुदान केंद्र सरकारकडून कंत्राटदार कंपनीला मिळणार आहे. 

खासदार गिरीष बापट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार आदी उपस्थित होते.पर्यावरणपूरक ईलेक्‍ट्रिक आणि हायब्रीड वाहनाच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून फेम-2 योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत या बसेस भाडेतत्वार घेण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बापट म्हणाले," डिसेंबर 2021 पर्यंत 150 ई-बस टप्प्या टप्याने पीएमपीच्या ताफ्यात सामिल होतील. 12 वर्षांच्या करारावर याबस भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. सर्व बस 12 मिटरच्या आत्याधुनिक, वातानुकूलित असणार आहे. यासाठी पीएमपीला प्रति कि.मी. 63 रुपये 94 पैसे मोजावे लागणार आहे. तसेच चार्जिंग स्टेशन कंत्राटदार कंपनीच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. बसच्या चार्जिंगचा खर्च पीएमपीला करावा लागणार आहे. 

खळबळजनक! राष्ट्रवादीच्या नगरसेवकच्या हत्येचा कट; येरवड्यात शिक्षा भोगणाऱ्या गुंडाने घेतली सुपारी!

डॉ. जगताप म्हणाले, "यापूर्वीच स्मार्टसिटीच्या माध्यमातुन 150 ई-बस भाडेतत्वार घेण्यात आल्या आहेत. पुढील वर्षभरात फेमच-2 च्या माध्यमातुन 150 नवीन ईबस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहे. तसेच पीएमपीच्या वतीने लवकरच 12 मिटरच्या बीआरटी मार्गावर चालविण्यासाठी 350 ई-बस भाडेतत्वावर घेण्याचा नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात 650 ईबसचा समावेश असणार आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात एकूण 2 हजार 194 बस असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहराच्या लोकसंख्येचा विचार केल्यास 3 हजार बसची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

पुणेकरांनो, 'थर्टी फर्स्ट'ला बाहेर पडताय? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

शहरातील पेठ, गावठाण परिसरात दिवसभर 10 रुपयात प्रवास करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी झोन तयार करण्यात येणार असून 10 रुपयाच्या तिकीटामध्ये दिवसभर पीएमपीने प्रवास करता येणार आहे.त्यासाठी महापालिकेकडून 50 ते 60 मिडीबस खरेदी करण्यात येणार आहे. 26 जानेवारी पासून ही सेवा सुरु करण्याच्या प्रयत्न आहे.एप्रिल 2020 मध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार होती. मात्र कोरोनामुळे शक्‍य झाले नाही. त्यासाठी 25 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता मात्र, या निधीतून 9 मिटरच्या वातानूकुलीत 50 ते 60 सीएनजी मिडी बस खरेदी करण्यात येणार आहे, असे हेमंत रासने यांनी सांगितले. 

सत्यजित तांबेचे संधीसाधू राजकारण संपूर्ण राज्याला माहित आहे - अंकिता पाटील

कोट्यवधी भाडे पीएमपी मोजणार 
फेम-2 अंतर्गत भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या बस प्रतिकिमी 63.94 रुपये पीएमपीला मोजावे लागणार आहे. तसेच चार्जिंगचा खर्च सुद्धा पीएमपीला उलचलावा लागणार आहे. साधारण एक बस दिवसभर 200 किमी चालल्या नंतर पीएमपीला 12 हजार 788 रुपये भाडे ठेकेदार कंपनीला द्यावे लागणार आहे. तर महिन्याला 3 लाख 83 हजार 640 रुपये द्यावे लागतील. तर दरवर्षी प्रतिबस भाड्यापोटी 46 लाख 3 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहे. अशा प्रकारे 12 वर्षासाठी एका बससाठी पीएमपीला 5 कोटी 52 लाख 44 हजार 160 रुपये कंपनीला द्यावे लागणार आहे. याच बरोबर प्रतिकिमी चार्जिंगसाठी 1 युनिट लागते. यामुळे प्रतिकिमी 7 रुपये वाढ होईल. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 150 Ebus join PMPs convoy under Fame2