esakal | बारामतीत कोरोनाचा कहर, एकाच दिवसात एवढे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

baramati

बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज पुन्हा एकदा वेगाने वाढली. आज शहरात एकाच दिवशी तब्बल 18 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून, यात बारामती शहरातील तब्बल 14, तर ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे.

बारामतीत कोरोनाचा कहर, एकाच दिवसात एवढे रुग्ण

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आज पुन्हा एकदा वेगाने वाढली. आज शहरात एकाच दिवशी तब्बल 18 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून, यात बारामती शहरातील तब्बल 14, तर ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने दोनशेचा टप्पा पार केला असून, आता ही संख्या 210 इतकी झाली आहे. बारामतीत बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्याही 101 वर पोहोचली आहे. 

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

बारामतीत काल घेतलेल्या नमुन्यांपैकी 21 नमुन्यांचा अहवाल आज प्रतिक्षेत होता. या मध्ये शहरातील प्रगतीनगर, महादेव मळा, तांदूळवाडी, रुई, आमराई, कृषी देवतानगर, खंडोबानगर, हरिकृपानगर या भागातील रुग्णांचा, तर तालुक्यातून डोर्लेवाडी, वंजारवाडी, गुनवडी, बऱ्हाणपूर येथील रुग्णांचा समावेश आहे. बारामतीतील मृतांचा आकडा 15 इतका असून, बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. बारामतीने म्हणता म्हणता दोनशेचा टप्पा पार केल्याने लोक चिंताग्रस्त आहेत.

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

बारामतीत जे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत, त्यांच्या संपर्कातील अनेक जण पॉझिटिव्ह निघत असल्याने संख्या वेगाने वाढू लागली आहे. शहरातील रुग्णांची संख्या तुलनेने अधिक असल्याने लोकांची काळजी अधिकच वाढू लागली आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचे असलेले अधिकचे प्रमाणही चिंताजनक आहे. 

बरे होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय 
बारामतीच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा जरी दोनशेंचा टप्पा पार करून गेलेला असला, तरी बारामतीत बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण निम्मे आहे. आज बारामतीत 210 रुग्ण संख्या असली, तरी प्रत्यक्षात 101 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत, ही बाबही महत्वाची असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी निदर्शनास आणली. कोरोनाग्रस्त असलेले ज्येष्ठ नागरिक यांच्यावरच अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले असून, कोणत्याही परिस्थितीत मृत्यू होऊ नये, या दृष्टीने आरोग्य यंत्रणा कार्यरत असल्याचे ते म्हणाले.