पुण्यात मद्यपींचा अक्षरश: 'धुरळा'; झालं असं...

पुण्यात मद्यपींचा अक्षरश: 'धुरळा'; झालं असं...
Updated on

पुणे : शहरात सरत्या वर्षाला निरोप देत 2020 या नववर्षाच्या स्वागतासाठी जंगी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या खास मद्यपार्ट्यांसाठी शंभर आयोजकांनी मद्यपरवाने घेतले आहेत. तर, अडीच लाखांहून अधिक नागरिकांनी एक दिवसाचा मद्य परवाना घेतला आहे.

'थर्टी फर्स्ट'ची रात्र साजरा करण्यासाठी मद्य पार्ट्या रंगणार आहेत. शहरातील पंचतारांकित हॉटेल्ससोबतच इतर हॉटेल्स आणि ग्रामीण भागातील फार्म हाऊसवरही खास पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री बाराचा ठोका पडताच "हॅपी न्यू इयर'चा जल्लोष करीत नववर्षाचे स्वागत केले जाते. थर्टी फर्स्टच्या निमित्ताने क्षेत्रीय निरीक्षक कार्यालयातून मद्य पिण्यासाठी अडीच लाख परवाने वितरीत करण्यात आले आहेत.

तसेच, ऑनलाइन मद्य परवाना देण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. 31 डिसेंबर रोजी मद्य पार्ट्यांच्या आयोजनासाठी शंभर परवाने देण्यात आले आहेत.

कोरेगाव पार्कमधून बनावट स्कॉचचा साठा जप्त

नववर्षाच्या निमित्ताने परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य येण्याची शक्‍यता असते. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी 14 पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांकडून एक डिसेंबरपासून आजपर्यंत 80 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

तसेच यामध्ये 30 डिसेंबर रोजी कोरेगाव पार्क परिसरात बनावट स्कॉच जप्त करण्यात आली. त्यात सुमारे साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सासवड भागात साडेसात लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com