खुबीने लपवीले २३ लाखांचे चंदन अखेर जिल्हा पोलिसांनी पकडलेच...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 December 2020

टेंपोच्या मागील हौद्यात मोठ्या खुबीने तळकप्पा करुन त्यात तब्बल २६ लाखांचे चंदन लपवून पोलिसांना हूल देत अहमदनगरला निघालेल्या चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने आज मध्यरात्री शिक्रापूरात जेरबंद केले. वरील संपूर्ण चंदन मुळशी व भोसरी परिसरातून चोरुन आणला होता. चंदन घेवून जाणारे केवळ वाहक होते.

शिक्रापूर - टेंपोच्या मागील हौद्यात मोठ्या खुबीने तळकप्पा करुन त्यात तब्बल २६ लाखांचे चंदन लपवून पोलिसांना हूल देत अहमदनगरला निघालेल्या चंदन तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने आज मध्यरात्री शिक्रापूरात जेरबंद केले. वरील संपूर्ण चंदन मुळशी व भोसरी परिसरातून चोरुन आणला होता. चंदन घेवून जाणारे केवळ वाहक होते. मुळ चंदनचोर, तस्कर व व्यापारी यांच्या साखळीपर्यंत आता पोलिस लवकरच पोहचणार असून या संपूर्ण कारवाईचे नियमन केले ते जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव यांनी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भोसरी व मुळशीतून चोरुन चंदन घेवून अहमदनगर येथे एक टेंपो चालला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना ३० तारखेला (सोमवारी) रात्री उशिरा समजली. श्री घनवट यांनी सदर माहिती डॉ.देशमुख यांना कळवून या टेंपोच्या शोधार्थ आपल्या पथका समवेत ते रवाना झाले ते पुणे-नगर महामार्गाचे दिशेने. सोमवारी मध्यरात्री शिक्रापूर येथील वेळनदीच्या पुलावर सदर संशयित टेंपो निदर्शनास येताच त्यांना त्याला हटकले व संपूर्ण टेंपोची तपासणी केली मात्र त्यात काहीच आढळले नाही. मात्र टेंपोच्या मागील हौद्यातील अंथरलेल्या गादीच्या खाली एक नटबोल्टची फळी आढळल्याने त्यांनी ती खोलली असता त्या खाली मोठ्या खुबीने  २२ लाख ८२ हजार ८८० एवढ्या बाजारमुल्याचे चंदन लपविल्याचे आढळले.

बॅकलाॅगची परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनेच; गैरप्रकारांना बसणार आळा

यावरुन घनवट यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे, मंगेश थिगळे, प्रसन्ना घाडगे, अक्षय नवले आदींनी सूरज कैलास उबाळे (वय २७, रा.चांदा, ता.नेवासा, जि.अहमदनगर) याचेसह या चोरीत वापरलेला टेंपो  (एम एच १७ - बीडी - २६९८) व २२ लाख ८२ हजार ८८० रुपयांच्या चंदनाच्या माल असे एकुण २५ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा ऐवज जप्त केला. दरम्यान या संपूर्ण कारवाईचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख स्वत: नियमन करीत होते तर ज्या ठिकाणांहून सदर चंदन चोरी केली गेली आहे तेथील माहिती, या चोरीत सहभागी सर्व अज्ञात आरोपी, या घटनेत सक्रीय टोळी यांची सखोल माहिती घेतली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वतीने सांगण्यात आले.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 lakh rupees sandle seized by police crime