
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संबंधित येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नऊ सप्टेंबरपूर्वी सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गामधून विद्यार्थ्यांना आता येत्या शनिवारपर्यत (ता.५) प्रवर्ग बदलण्याची संधी दिली जाणार आहे.
पुणे - तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध संबंधित येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नऊ सप्टेंबरपूर्वी सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गामधून विद्यार्थ्यांना आता येत्या शनिवारपर्यत (ता.५) प्रवर्ग बदलण्याची संधी दिली जाणार आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये संबंधित पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नऊ सप्टेंबर पूर्वी एसईबीसी प्रवर्गातून अर्ज निश्चित केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या अर्जासाठी ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या लॉगिनमधून अर्जामधील एसईबीसी प्रवर्ग बदल करून खुल्या प्रवर्गामध्ये किंवा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्या दुर्बल घटक (ओपन ईडब्ल्यूएस) प्रवर्गामध्ये रूपांतरीत करून घेण्यासाठी 'एसईबीसी कन्वर्जन' या लिंकवर जाऊन प्रवर्गात बदल करावा, असे तंत्रशिक्षण संचालनालयाने सांगितले आहे.
पदवीधरमध्ये तिप्पटीने, तर शिक्षकांमध्ये दुप्पटीने मतदानाचा टक्का वाढला
विद्यार्थ्यांनी स्वतःचा अर्ज (ओपन ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून निश्चित केल्यास आणि अशा विद्यार्थ्यांना केंद्रीभूत फेरी अंतर्गत ईडब्ल्यूएस प्रवर्गातुन प्रवेश देण्यात आल्यास संबंधित उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश प्रक्रियेच्या माहितीपुस्तिकेमध्ये 'प्रोफॉर्मा-व्ही'मध्ये नमूद केलेल्या ईडब्ल्यूएस संवर्गाचे प्रमाणपत्र प्रवेश मिळालेल्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करताना सादर करणे बंधनकारक राहणार आहे. हे प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश संस्थेद्वारे निश्चित करण्यात येणार नाही. तसेच हे विद्यार्थी त्या जागेवरील आपला हक्क (दावा) गमावतील. याबाबत सविस्तर माहिती "https://poly20.dtemaharashtra.org" या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांची मंचरसाठी नगरपंचायतीची मागणी
Edited By - Prashant Patil