बॅकलाॅगची परीक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीनेच; गैरप्रकारांना बसणार आळा

ब्रिजमोहन पाटील
Tuesday, 1 December 2020

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिमपूर्व वर्षातील बॅकलाॅग व श्रेणीसुधार परीक्षा आॅनलाइन घेताना त्यात गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर केला जाणार आहे. काॅपी होत असल्याचे लक्षात आल्यास विद्यार्थ्यांना कारवाईला केली जाणार आहे.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिमपूर्व वर्षातील बॅकलाॅग व श्रेणीसुधार परीक्षा ऑनलाईन घेताना त्यात गैरव्यवहार होऊ नये यासाठी प्रॉक्टर्ड मेथडचा वापर केला जाणार आहे. काॅपी होत असल्याचे लक्षात आल्यास विद्यार्थ्यांना कारवाईला केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेतली. त्यात अडीच लाख पैकी सुमारे २ लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन  परीक्षा दिली. पण ही परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाॅट्सॲप ग्रुपवर चर्चा करून, गुगलद्वारे उत्तर शोधून घोळक्याने बसून परीक्षा दिल्याचे प्रकार समोर आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी काॅपी कशी करावी याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामुळे बर्याच विद्यार्थ्यांचा इतर वर्षातील निकाल व अंतिम वर्षाचा निकाल यात मोठ्याप्रमाणात सुधारणा झाल्याचेही लक्षात आले आहे. विद्यापीठाला या ऑनलाईन  परीक्षेतील मर्यादा समोर आल्याने प्रॉक्टर्ड पद्धतीचा वापर करण्याबाबत विचार करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत सुतोवाच ही केले होते. 

पदवीधरमध्ये तिप्पटीने, तर शिक्षकांमध्ये दुप्पटीने मतदानाचा टक्का वाढला 

परीक्षा विभागातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या बॅकलाॅग परीक्षेत विद्यार्थ्यांना काॅपी करता येणार नाही. परीक्षा सुरू झाल्यावर त्यांचा फ्रंट कॅमेरा सुरू होईल. मोबाईल स्क्रिनमध्ये विद्यार्थी वगळता इतर कोणी दिसल्यास त्यांचा फोटो निघेल. तसेच विद्यार्थ्यांने परीक्षा देताना परीक्षेच्या ॲप ऐवजी गुगल, वाॅट्सॲप किंवा इतर कोणतीही विंडो ओपन केली तर ते देखील परीक्षा विभागला कळणार आहे. या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार करताना त्यांना दोन ते तीन वेळेस इशारा दिला जाईल, त्यानंतर कारवाई केली जाईल. सराव परीक्षेसाठीचा ईमेल विद्यार्थ्यांना पाठवताना या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत, असेही सुत्रांनी सांगितले.

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना बदल करण्यासाठी मुदत

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: backlog exam will be held in the prescribed manner