हवेलीत 208 पैकी 23 शाळा सुरू; इंगजी माध्यमातील पालकांचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

हवेली तालुक्यात आज पुणे शहर, पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगत असल्यामुळे याच परिसरामध्ये मराठी माध्यमापेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत या परिसरात राज्यातील नामवंत शिक्षण संस्थाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा देखील समावेश आहे. 

खडकवासला(पुणे) : हवेली तालुक्‍यातील 9 वी ते 12वी पर्यंतच्या 208 शाळांपैकी फक्त 23 शाळा म्हणजे 11 टक्के शाळा पहिल्या दिवशी सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू होण्यामध्ये मराठी शाळा जास्त संख्या होती आहे तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या कमी आहे. 

हवेली तालुक्यात आज पुणे शहर, पिंपरी-चिंचवडच्या हद्दीलगत असल्यामुळे याच परिसरामध्ये मराठी माध्यमापेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत या परिसरात राज्यातील नामवंत शिक्षण संस्थाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा देखील समावेश आहे. 

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पटेल रुग्णालयात बसविणार ऑक्सिजन टँक

हवेली तालुक्यातील वाघोली, मांजरी, नऱ्हे, लोणी- काळभोर मांगडेवाडी परिसरात आता पर्यत कोरोणाचे रुग्ण जास्त सापडले होते. तालुक्यात आज अखेर 14 हजार 401 जणांना कोरोना झाला होता. ही संख्या काही जिल्ह्याच्या रुग्ण संख्येएवढे आहे. 

"शहरालगत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळामधील शाळा व्यवस्थापन समित्यांनी पालक सभा घेतल्या आहेत. यामध्ये ठराव करून त्यांनी पाल्य शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वाहतूक व्यवस्था देखील नसल्यामुळे देखील अनेक विद्यार्थी शाळेत येण्यास मर्यादा येत आहेत. अनेक शिक्षकांच्या कोरोणाच्या तपासण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे काही शाळा सुरू झालेल्या नाहीत. शिक्षकांच्या तपासण्या झाल्यानंतर शाळा सुरू होण्याची संख्या वाढेल." असे हवेलीचे गट शिक्षण अधिकारी रामदास वालझडे यांनी सांगितले.

Video: आता सिगारेटची थोटकंही मोजली जाणार; पुण्यात 'चॉक फॉर शेम' मोहिम

हवेली तालुक्याचा पश्चिम विभागात विचार केला असता या भागात मांगडेवाडी, शिवापूर, शिवणे, सांगरून, वरदाडे, गोऱ्हे बुद्रुक अशी केंद्र आहेत. या केंद्रांअंतर्गत 47 शाळा आहेत. त्यापैकी दहा शाळा या परिसरातील सुरू झाल्या होत्या. 

तालुक्यातील आजची स्थिती
शाळा संख्या - 208 
सुरू झालेल्या शाळाची संख्या-23 
एकूण शिक्षक- 1330 
चाचणी झालेले शिक्षकांची संख्या- 737 
पॉझिटिव्ह संख्या- तीन
 

हडपसर उड्डाणपुलाखालून १ वर्षाच्या बाळाचे अपहरण; आठवड्यातील दुसरी घटना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 23 out of 208 schools started in the haveli district