बारामतीत कोरोना उद्रेक; २४ तासात ११० रुग्ण पॉझिटीव्ह

मिलिंद संगई
Wednesday, 2 September 2020

बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. गेल्या तीनच दिवसात जवळपास तीनशे रुग्णांची भर पडल्याने बारामतीत आता समूह संसर्ग झाला की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

बारामती : शहरात आज कोरोनाचा उद्रक झाला आहे. या साथीची तीव्रता वाढल्यानंतर आज उच्चांकी म्हणजे 110 रुग्ण गेल्या 24 तासात पॉझिटीव्ह आल्याने बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे.
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असून ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. गेल्या तीनच दिवसात जवळपास तीनशे रुग्णांची भर पडल्याने बारामतीत आता समूह संसर्ग झाला की काय अशी भीती निर्माण झाली आहे. तपासण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी रुग्णांच्या संख्येत होणारी त्यातही कुटुंबातच होणारी लागण हा काळजीचा विषय ठरत आहे.

बारामतीत काल आरटीपीसीआरचे 148 नमुने घेतले गेले, त्या पैकी 72 नमुने पॉझिटीव्ह तर खाजगी प्रयोगशाळेत घेतलेल्या 63 पैकी 21 जण पॉझिटीव्ह सापडले. दुसरीकडे मृत्यूचा आकडाही आता 41 वर जाऊन पोहोचला असून इतर तालुक्यातूनही बारामतीत येणा-या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.

हे वाचा - शांत बेलबाग चौक अन् निवांत पोलिस ; अनंत चतुर्दशीचे दुर्मिळ दृष्य

बारामतीत प्रशासनाच्या वतीने लक्षणे असलेल्या व नसलेल्यांसाठी बेडसची व्यवस्था होत असली तरी चिंताजनक रुग्णांसाठी व्हेंटीलेटरसाठी मात्र अजूनही पळापळ करावी लागत आहे. विनामास्क फिरणे, सॅनेटायझर्सचा वापर न करणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे या सारख्या बाबींमुळे पटकन लोकांना संसर्ग होतो आहे.

प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुनही लोक गर्दी करण्याचे टाळत नाहीत. गरज असल्यासच घराबाहेर पडा, असे सांगूनही लोक त्या कडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. स्वताः सोबतच इतरांनाही कोरोनाचा प्रसाद आपण देतो आहोत याचे भानही अनेकांना राहिलेले नाही. बाहेरगावाहून येणा-या किंवा बारामतीबाहेर कामानिमित्त जाऊन पुन्हा बारामतीत मुक्कामास येणा-यांकडूनही कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती पुढे येत आहे. दरम्यान आज पासून सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातही आरटीपीसीआर स्वॅब संकलनाचे काम सुरु होणार असल्याने बारामती शहरातील रुग्णांना रुई रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही, सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत येथे स्वॅबचे संकलन केले जाणार आहे.

मोरया मोरयाच्या जयघोषात दगडूशेठ, मंडई गणपतीचे साधेपणाने विसर्जन 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 24 hours 110 percent corona positive in Baramati