esakal | बारामतीतील सिल्व्हर ज्युबिलीतील 24 बेड्सला ऑक्‍सिजन 
sakal

बोलून बातमी शोधा

baramati.jpg

येत्या चार दिवसांत बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील 24 बेडच्या ऑक्‍सिजन सुविधेचे काम पूर्ण होईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिली. 

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिलीतील 24 बेड्सला ऑक्‍सिजन 

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : येत्या चार दिवसांत बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयातील 24 बेडच्या ऑक्‍सिजन सुविधेचे काम पूर्ण होईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिली. 

बारामतीतील अधिकारी माध्यमांना माहिती देण्यास करताहेत टाळाटाळ

जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेत काही सूचना केल्या. या रुग्णालयात सध्या कोरोना पॉझिटिव्ह परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. येत्या दहा दिवसांत रुग्णालयाच्या 90 बेडना पाईपमधून ऑक्‍सिजनच्या सुविधेचे काम पूर्ण होईल, असे काळे यांनी सांगितले. जनरेटर बॅकअप व इन्व्हर्टर बॅकअपचेही काम आठवडाभरात पूर्ण होईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या रुग्णालयासाठी अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी डॉ. काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या रुग्णालयातील 100 बेडपैकी 20 अतिदक्षता विभागात आहेत. रुग्णालयाच्या मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने कंत्राटी स्वरुपात परिचारिका, डॉक्‍टर तसेच इतर पदांसाठी जाहिरात प्रसिद्धीस देण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील ऑक्‍सिजन प्लॅंटची पाहणी करून काही सूचना केल्या. 

Video:गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा विशेष लघुपट; तुम्ही पाहिला का?

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जगताप या प्रसंगी उपस्थित होते.