Big breaking : अबब! आजचा पुण्यातील मृतांचा आकडा वाचा; नागरिकांनो आतातरी काळजी घ्या

co.jpg
co.jpg

पुणे : पुण्यात कोरोनाने रुदावतार दाखवत मंगळवारी एका दिवसांत सर्वाधिक 25 रुग्णांचा श्‍वास रोखला आहेत. या मृतांमध्ये निम्म्या महिला असून, त्यात 38 आणि 40 वर्षांच्या रुग्णांचाही समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या संख्येने रुग्ण दगावल्याने पुणेकरांत प्रचंड घबराट पसरली आहे. याआधी एकादिवसांत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत शहरात 345 जणांचा जीव गेला आहे. त्याचवेळी आणखी 35 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 

दुसरीकडे, नवे रुग्णही वाढले असून, दिवसभरात 266 रुग्णांची भर पडली आहेत. तर 169 रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, 165 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने कळविले आहे. 

शिवाजीनगर भागातल 56 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला असून, त्यांना हदयरोग आणि क्षयरोगाचा त्रास होता. गुलटेकडीतील68 वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे जीव गेला आहे. त्यांच्यावर 21 मेपासून उपचार सुरू होते. त्यांना हदयरोगाचा त्रास होता. गणेश पेठेतल 78 वर्षांच्या पुरुषाचाही मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला उच्चरक्तदाब, हदयरोग होता. हडपसरमधील 45 वर्षांच्या महिलेचाही मृतांमध्ये समावेश असून, त्यांना उच्चरक्तदाब, फुफुस्साचा आजार होता.

दरम्यान, याच भागातील 60 आणि 62 वर्षांच्या आणखी दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दोघींनाही अन्य आजार होते. तसेच, हडपसरमधील 51 वर्षांच्या पुरुषाचा बळी गेला आहे. त्यांना उच्चरक्तदाब, फुफुस्साचा विकार होता. ताडीवाला रस्ता परिसरातील 65 वर्षांच्या महिलेसह, लष्कर परिसर, विश्रांतवाडी, येरवड्यातील महिलांचा मृत्यू झाला आहे. अन्य भागांतील मृतांचा समावेश असून, सर्वच मृतांना अन्य आजार असल्याचेही तपासणीतून पुढे आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात आतापर्यंत 52 हजार 460 नागरिकांची तपासणी झाली आहे. त्यातील 6 हजार 795जणांना कोरोना झाला आहे. मात्र, त्यापैकीचे 4 हजार 119 रुग्ण बरे झाले आहे. तर आतापर्यंत 345 जण दगावले आहेत. त्यामुळे सध्या 2 हजार 331 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com