पुणे : वाळूच्या हद्दीवरून वाद, डोक्यात वार करून तरुणाचा खून

crime
crime

देऊळगाव राजे : मलठण (ता.दौंड) हद्दीतील वाळू काढताना हद्दीच्या वादातून शिरापूर येथील निखिल संतोष होलम (वय २६) या तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी निखिल यांच्या डोक्यावर वार करुन त्याचा मृतदेह पाण्यात फेकून दिला.

याप्रकरणी दौंङ पोलिसांनी आठ जणांवर खून आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.  

या प्रकरणी नितीन लवंगारे,लाला आमनर यांना अटक केली असून गणेश शेंडगे, प्रकाश दळवी, राहुल शेंडगे, अमोल लवंगारे (सर्व रा. मलठण, ता.दौंड) तसेच इतर दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रमेश होलम यांनी फिर्याद दाखल केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींना दौंड न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. इतर आरोपी मात्र फरार आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक महाडीक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com