esakal | Vidhan Sabha 2019 : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज बाद
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज बाद

- अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85 उमेदवारी दाखल.

Vidhan Sabha 2019 : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 27 अर्ज बाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कँटोन्मेंट : अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 85 उमेदवारी दाखल झाले होते. त्यापैकी 58 अर्ज वैध झाले असून, 27 अर्ज अवैध ठरले आहेत, अशी माहिती पुणे कँटोन्मेंट मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नीता शिंदे यांनी दिली.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात मुख्य राजकीय पक्षाचे उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.त्यामध्ये भाजप शिवसेना युतीचे सुनिल कांबळे, कॉग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे रमेश बागवे, वंचित बहुजन आघाडीचे लक्ष्मण आरडे, एमआयएमच्या हिना मोमीन, आम आदमी पार्टीचे खेमदेव सोनवणे, मनसेच्या मनिषा सरोदे, बहुजन मुक्ती पार्टीचे हुलगेश चलवादी यांच्यासह बंडखोरी केलेले काँग्रेसचे सदानंद शेट्टी, भाजपचे भरत वैरागे, शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांच्यासह उर्वरित अपक्षांचे अर्ज वैध ठरले आहेत.

जवान चंदू चव्हाण यांचा लष्कराचा राजीनामा

राखीव असलेल्या पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 85 उमेदवारांनी 89 अर्ज दाखल केले होते. अर्ज दाखल केलेल्यांमध्ये सर्वाधिक उमेदवार हे माढा (सोलापूर जिल्हा), नाशिक, सातारा, रायगड, मुळशी, काशेवाडी आणि मंगळवार पेठेतील उमेदवार असून, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उमेदवारांची संख्या सर्वांत अधिक असल्याचे दिसून आले.

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री फडणवीस यांचा उमेदवारी अर्ज वैध

दरम्यान, सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून, त्यानंतर लागलीच निवडणुकीच्या रिंगणात उरलेल्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.