esakal | खडकवासला येथे ३४  मिलिमीटर पाऊस; दीड तास मुसळधारांनी जनजीवन विस्कळीत

बोलून बातमी शोधा

rain

खडकवासला आणि धरण परिसरात सोमवारी संध्याकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असा दीड तास मुसळधार पाऊस पडला.

खडकवासला येथे ३४  मिलिमीटर पाऊस; दीड तास मुसळधारांनी जनजीवन विस्कळीत
sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला आणि धरण परिसरात सोमवारी संध्याकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असा दीड तास मुसळधार पाऊस पडला. खडकवासला येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामध्ये खडकवासला परिसरातील वारजे माळवाडी कर्वेनगर, चांदणी चौक, कोथरूड, बावधन, त्याचबरोबर कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर, एनडीए, खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, धायरी, वडगाव, डोणजे गोऱ्हे बुद्रुक, खानापुर, घेरा सिंहगड या परिसरात पाऊस पडला. यावेळी मुसळधार पावसाच्या जोडीला ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वाऱ्याचा जोर देखील मोठा होता. या दीड तासाच्या पावसाने ठिकाणी सर्व ठिकाणी रस्त्यांनी पाणी वाहिले सिंहगड रस्त्यावरील राजयोग सोसायटी कडे जाणाऱ्या सिग्नलच्या परिसरात रस्त्यावर पाणी साठले होते. त्याच्या पुढे ग्रीनफिल्ड हॉटेल च्या समोरच्या बाजूला देखील रस्त्यावर पाणी साठलं होतं. त्यानंतर नांदेड फाटा जवळ कडबाकुट्टी च्या परिसरात वडाची झाड आहे त्या ठिकाणी देखील रस्त्यावर अर्धा ते एक फुटापर्यंत पाणी साठलेले होतं या ठिकाणी पाण्यातून वाट काढताना दुचाकी चालक सायकल चालक, रिक्षा चालक यांची कसरत सुरू होते.

हेही वाचा - ‘रेमडेसिव्हिर’ घ्यायलाच हवं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?​

भीमा खोऱ्यात ही पाऊस 
खडकवासला येथे ३४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. वरसगाव १५, पानशेतला ११, मिलिमीटर पाऊस पडला आहे. भीमा खोऱ्यातील वेल्हे तालुक्यातील घीसर येथे २७, भालवडी १०, भोरच्या शिरवली १४, मुळशी तालुक्यातील दासवे १७,  मावळ तालुक्यातील कोळे दहा मिलिमीटर पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी धरण या ठिकाणी ४४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृष्णा खोऱ्यातील कुंभी ७८ मिलिमीटर
याच बरोबर कृष्णा खोऱ्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा जवळील कुंभी येथे ७८ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. परिसरातील निवळे ३६, वारणा ३५, गगनबावडा १८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पन्हाळा जवळील पत्र्याची वाडी येथे सतरा तर अंबाले येथील ११मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे १५ , कोयनानगर १७ , तर पाटण तालुक्यातील तारळी १० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.