esakal | पुणेकरांना कोरोनाबाबत दिलासा नाहीच; पुन्हा आढळले साडेतीन हजारावर रुग्ण!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Patients

गेल्या चोवीस तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४३ रुग्ण आहेत.

पुणेकरांना कोरोनाबाबत दिलासा नाहीच; पुन्हा आढळले साडेतीन हजारावर रुग्ण!

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : सप्टेंबर महिना उजाडला तरीही पुणेकरांना कोरोनाबाबत दिलासा मिळेनासा झाला आहे. किमान आता तरी दररोज वाढणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या कमी होईल, असे वाटत होते. पण ही संख्या कमी होण्याऐवजी उलट दिवसेंदिवस ती वाढू लागली आहे. बुधवारी (ता.२) जिल्ह्यात पुन्हा एकदा ३ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६२७ रुग्ण आहेत. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ११, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६७४, नगरपालिका क्षेत्रात १७९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ४४ रुग्णांचा समावेश आहे.

पुणे महापालिकेने 'अनलॉक-४'ची नियमावली केली जाहीर; वाचा कोणत्या गोष्टी सुरू आणि बंद राहणार​

दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४३ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १२, जिल्हा परिषद क्षेत्रातील ९, नगरपालिका ९ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता.१) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार २८२,  कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३७ हजार ६३८ तर रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४ हजार २५७ झाली आहे. मृत्यू  झालेल्यांमध्ये  पुणे जिल्ह्याबाहेरील १२१ रुग्ण आहेत. 

मोठी बातमी : पीएमपी पुन्हा रस्त्यावर धावणार; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून बससेवा सुरू​

संस्थानिहाय एकूण रुग्ण 

- पुणे महापालिका - ९८ हजार ६५५.

- पिंपरी चिंचवड महापालिका - ५१ हजार ३०७.

- जिल्हा परिषद (ग्रामीण) - १८ हजार २१३.

- नगरपालिका - ५ हजार ४९४.

- कटक मंडळे - ३ हजार ५७३.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image