पुणे महापालिकेने 'अनलॉक-४'ची नियमावली केली जाहीर; वाचा कोणत्या गोष्टी सुरू आणि बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

निवासी सोय असलेल्या हॉटेल व लॉज यांना तीस टक्के क्षमतेने परवानगी देण्यात होती. ती आता शंभर टक्के क्षमतेसह खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र ही खुली करण्यास परवानगी देताना त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांबाबतचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे.

पुणे : निवासी सोय असलेल्या हॉटेल आणि लॉज यांना शंभर टक्के क्षमतेसह, तर खासगी कार्यालयात तीस टक्के कर्मचारी उपस्थितीत ठेवून व्यवसाय सुरू करण्यास पुणे महापालिकेकडून बुधवारी (ता.२) परवानगी देण्यात आली. मात्र शहरातील शाळा, कॉलेज, खासगी क्‍लासेस, रेस्टॉरंन्ट (हॉटेल), चित्रपटगृहे जलतरण तलाव, व्यायामशाळा या मात्र तीस सप्टेंबरपर्यंत खुली करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. 

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!​

केंद्र आणि राज्य सरकारकडून अनलॉक-4 ची नियमावली जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये हॉटेलसह सर्व सुविधा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु त्याबाबतचे आदेश पुणे महापालिकेकडून काढण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पुणे शहरात या सर्व गोष्टी कधी सुरू होणार यांची चौकशी होत होती. अखेर बुधवारी सायंकाळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरासाठी अनलॉक-4 नियमावली जाहीर करण्यात आली. 

मोठी बातमी : पीएमपी पुन्हा रस्त्यावर धावणार; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून बससेवा सुरू​

यापूर्वी निवासी सोय असलेल्या हॉटेल व लॉज यांना तीस टक्के क्षमतेने परवानगी देण्यात होती. ती आता शंभर टक्के क्षमतेसह खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र ही खुली करण्यास परवानगी देताना त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांबाबतचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. तर पूर्वी प्रमाणेच शॉपिंग मॉल व कॉम्प्लेक्‍स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्यामधील चित्रपटगृहांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सर्व खासगी आस्थापना कार्यालय यापूर्वी दहा टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करीत आता 30 टक्के मनुष्यबळासह ती सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. टॅक्‍सी आणि चारचाकी वाहनांना चालकासह तीन प्रवासी, तर रिक्षांना चालक आणि दोन प्रवासी घेऊन वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

'एमबीबीएस'च्या परीक्षेचं होतं टेन्शन; वडिलांसोबत गणपती दर्शनाला गेला अन् तिथून पळला!​

हे सुरू राहणार 
- निवासाची सोय असलेले हॉटेल व लॉज यांना शंभर टक्के परवानगी 
- खासगी आस्थापना कार्यालयात तीस टक्के कर्मचारी वर्गासह सुरू करण्यास परवानगी 
- आंतरजिल्हा वाहतुकीसाठी निर्बंध नाही, वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही. 
- पीएमपी बसला प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी 
- शॉपिंग मॉल मधील थिएटर वगळून सुरू ठेवण्यास मान्यता 
- रेस्टॉरंट (हॉटेल) मधून पार्सल सेवा सुरू ठेवता येणार 
- सर्व प्रकाराचे मैदानी खेळ, व्यायाम यांना परवानगी 
- ब्युटी पार्लर, केशकर्तनालय 

हे बंद राहणार 
- शाळा, कॉलेज, कोचिंग क्‍लासेस 
- चित्रपटगृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे 
- रेस्टॉरंन्ट, जलतरण तलाव, बागा 
- नाट्यगृह, सभागृह, बार 
- सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम 
- साठ वर्षांवरील आणि दहा वर्षांच्या आतील मुले यांना विनाकारण बाहेर पडण्यास बंदी 
- मास्क वापरणे बंधनकारक 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Corporation announced rules of Unlock 4 on Wednesday 2nd 2020