पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. १९) दिवसभरात ३७७ नवे कोरोना रुग्ण

पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१९) दिवसभरात ३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ४६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
corona vaccination
corona vaccinationsakal

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता. १९) दिवसभरात ३७७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून ४६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील ११२ रुग्ण आहेत. मंगळवारी जिल्ह्यात आठ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

शहरातील ११२ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ६८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७७, नगरपालिका हद्दीत १५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांत पुणे शहरातील ११९, पिंपरी चिंचवडमधील ९३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २२५ आणि नगरपालिका हद्दीतील २९ रुग्णांचा समावेश आहे.

corona vaccination
पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची गरज; रामदास आठवले

सध्या जिल्ह्यात ४ हजार १८९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २ हजार ३०७ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार चालू असून, १ हजार ८८२ जण गृह विलगीकरणात आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील चार मृत्यू आहेत. त नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा दिवसभरात मृत्यू झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com