मुंबई-पुण्यात मास्क अन् सॅनिटायझरचा मोठा काळाबाजार; 41 लाख मास्क पोलिसांनी केले जप्त!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

मुंबईसह पुण्यात देखील मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार झाला आहे.

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचे उघड झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकट्या मुंबईमध्ये पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये 41 लाख 17 हजार 605 मास्क आणि 18 हजार 676 सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेली नाही. मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यातून देखील लाखो मास्क आणि सॅनिटायझर जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

- 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!

या सर्व वैद्यकीय वस्तू डॉक्टर, नर्स, पोलिस आणि सफाई कर्मचारी यांच्यासह कोरोनाविरोधात लढणाऱ्या सर्वांना उपलब्ध करून देण्याची याचिका न्यायालयात उच्च न्यायालयात दाखल आहे. त्यावर न्यायालयाने पोलिसांकडून मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत साठेबाजी झालेल्या 21 ठिकाणी पोलिसांनी जप्तीची कारवाई केली असून त्यातील 21 जणांविरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.

- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात या दोन्ही वस्तू मुबलक प्रमाणात मिळत नव्हत्या. त्यामुळे काळाबाजर करणाऱ्यांनी या वस्तूंचा साठा करून ठेवला होता. त्यातून कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने या दोन्ही वस्तू चढ्या दराने विकल्या जात होत्या. त्यामुळे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार साठेबाजी करणाऱ्यांवर छापा टाकून संबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पुणेकरांनो एेकलंत का ! हापूसची चव फक्त आठ ते दहा दिवसच चाखता येणार

शहरात 18 हजार मास्क जप्त : 
मुंबईसह पुण्यात देखील मास्क आणि सॅनिटायझरचा काळाबाजार झाला आहे. पोलिसांच्या युनिट-1 ने केलेल्या कारवाईत 18 हजार मास्क जप्त करण्यात आले आहेत.

याबाबत याचिका दाखल केली तेव्हा त्यात तीनच कारवायांचा उल्लेख होता. त्यातील एक पुण्यातील व दोन मुंबईच्या होत्या. त्यात जप्त केलेला मुद्देमाल हा 15 कोटी रुपयांचा होता. त्यामुळे राज्यभरातील कारवायांचा विचार केला असता हा आकडा मोठा आहे.
- अॅड. हर्ष पार्टे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 lakh masks seized in Mumbai alone