पुणे जिल्ह्यातील ४१ टक्के शाळा झाल्या सुरू

मीनाक्षी गुरव
Tuesday, 1 December 2020

'इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम शिकविणे जवळ-जवळ संपत असताना अचानक शाळा बंद झाल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला, ही माहिती विविध माध्यमातून समोर येत होती. कोरोनाबाबत फारशी जाण नव्हती. पण, त्यानिमित्ताने शाळेला सुटी असल्याने काहीसा आनंद झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसात लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर मात्र कंटाळा येऊ लागला.

पुणे - 'इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम शिकविणे जवळ-जवळ संपत असताना अचानक शाळा बंद झाल्या. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला, ही माहिती विविध माध्यमातून समोर येत होती. कोरोनाबाबत फारशी जाण नव्हती. पण, त्यानिमित्ताने शाळेला सुटी असल्याने काहीसा आनंद झाला होता. मात्र अवघ्या काही दिवसात लॉकडाऊन जाहीर झाला, त्यानंतर मात्र कंटाळा येऊ लागला. अनलॉकमध्येही आरोग्याची काळजी म्हणून घराबाहेर पडता येत नव्हते. दरम्यान नववीचे ऑनलाइन शिक्षण सुरूच होते. सुरवातीला त्याची गमंत वाटली. अवघ्या काही दिवसांत ऑनलाइन वर्गात आम्ही कंटाळून जाऊ लागलो. आता दिवसाआड शाळा सुरू झाल्याने शिक्षक, मित्र भेटत असून जीवात-जीव आल्यासारखे वाटत आहे," असा अनुभव प्रतीक सांगत होता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा संसर्ग काहीसा आटोक्यात आल्याने राज्य सरकारने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याला मान्यता दिली. त्यानुसार गेल्या सोमवारपासून राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड वगळता पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण केवळ १७ टक्के शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र आता जिल्ह्यातील ४१.८१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र शाळेमध्ये अद्यापही विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी दिसते. शाळा सुरू होऊन आठवडयाभरात केवळ ५.६ टक्के विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत.

पुणे-जम्मूतावी दरम्यान आठ महिन्यानंतर ट्रेन धावणार

पुणे जिल्ह्यात एक हजार १४३ शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यात जवळपास दोन लाख ९५ हजार २९ विद्यार्थी या वर्गात शिक्षण घेत आहेत. एकूण शाळा आणि कनिष्ठ महाविलयांपैकी सध्या ४७८ शाळा/महाविद्यालये सुरू झाली आहेत. तर जवळपास १६ हजार ८१४ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली आहे.

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट...अश्लील व्हिडिओ कॉल अन् पैशांची मागणी...

नववी ते बारावीच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील सद्यस्थिती -
तालुका : ९वी ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या - विद्यार्थी संख्या : सुरू झालेल्या शाळा/महाविद्यालयांची संख्या : उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या
आंबेगाव : ५८ : १२,७२५ : २८ : १,९०१
बारामती : ८३ : २७,७९८ : ५४ : १,७०७
भोर : ५४ : ८,४३९ : २५ : ८८१
दौंड : ८४ : १९,३३९ : ६१ : २,५३२
हवेली : २०८ : ७१,१२७ : ३८ : १,७२३
इंदापुर : १०४ : १८,६१० : ५२ : ८९३
जुन्नर : १०४ : २२,४९८ : ६० : १,९१२
खेड : १०४ : २४, ८९३ : ३१ : ८६२
मावळ : ९५ : ३९,३६१ : ३८ : ९३३
मुळशी : ८१ : १३,५५३ : १६ : १४८
पुरंदर : ७० : ११,८५० : ४९ : २,१५९
शिरूर : ८६ : २२,६६२ : १५ : ६११
वेल्हा : १२ : २,१७४ : ११ : ५५२
एकूण : १,१४३ : २,९५,०२९ : ४७८ : १६,८१४

हृदयद्रावक : जन्मदात्या आई-वडिलांना चालले होते आळंदीत सोडून पण...

'जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच मी देखील स्वतः काही शाळांना भेटी दिल्या आहेत. या भेटी दरम्यान शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे पहायला मिळाले. प्रत्यक्ष शाळेमध्ये येऊन शिकण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. शाळेतील संबंधित सर्व अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांची आरोग्याविषयक अधिकाधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत."
- डॉ. गणपत मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 41 percent schools started in Pune district