आठ दिवसांपूर्वीच झाले लग्न अन् आता 'तो'...

corona logo1.jpg
corona logo1.jpg

वाघोली (पुणे) : वाघोलीत गुरुवारी नऊ कोरोना बधितांची भर पडली. त्यांच्या संपर्कातील 41 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल उद्या सायंकाळपर्यंत अपेक्षित आहे. 24 ते 45 वयोगटातील वाघोलीतील विविध परिसरातील हे बाधित आहेत. त्यामध्ये आठ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या एका तरुणाचाही समावेश आहे. या नऊ रुग्णांच्या संपर्कातील 41 जणांचे स्वॅब घेऊन त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले.

पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या मात्र वाघोलीतील बँकेत व्यवपस्थापक असणाऱ्या व्यक्तीलाही बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांचेही स्वॅब घेण्यात आले आहेत. वाघोलीतील बधितांची संख्या 35 झाली आहे. त्यातील 21 जण ठणठणीत बरे झाले असून 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. वाघोली शहराच्या सीमारेषेवर आहे. येथून पुणे शहरात कामासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संक्रमण वाढत आहे. आयटी कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 35 पैकी 2 ते 3 आयटी कर्मचारीही संक्रमित झाले आहेत.

जे नागरिक कामासाठी पुणे शहरात अथवा अन्य ठिकाणी जातात त्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तर भाजी विक्रेते व व्यावसायिकांनी आवर्जून मास्क वापरावा असे आवाहन डॉ नागसेन लोखंडे यांनी केले. ही साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सरपंच वसुंधरा उबाळे व ग्रामसेवक अनिल कुंभार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com