esakal | Coronavirus : राज्यात गेल्या 3 दिवसांमध्ये आढळले 48 कोरोना रुग्ण!

बोलून बातमी शोधा

Coronavirus-Patient

21 मार्चपासून प्रत्येक दिवशी दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

Coronavirus : राज्यात गेल्या 3 दिवसांमध्ये आढळले 48 कोरोना रुग्ण!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात गेल्या संपूर्ण आठवड्यात आढळलेल्या कोरोना संसर्गाच्या रुग्णांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद गेल्या तीन दिवसांमध्ये झाली अहे. कोरोनाचा संसर्ग झालेले 41 रुग्ण गेल्या आठवड्यात होते. तर या आठवड्यात आतापर्यंत 48 रुग्णांची नोंद झाली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात 9 मार्चला कोरोना विषाणूंचा संसर्गाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्कातील एक-एक जणांना संसर्ग झाल्याचे निदान होऊ लागले. पुण्याबरोबरच मुंबई, नागपूर, यवतमाळ या भागात कोरोनाच्या रुग्ण आढळून आले. राज्यात 9 ते 15 मार्च या पहिल्या आठवड्यात 33 रुग्णांची नोंद झाली.

- Big Bazaar चा मोठा निर्णय; लॉकडाऊनमध्ये घरपोच मिळणार धान्य आणि भाज्या...

दुसऱ्या आठवड्यात ही संख्या 41 पर्यंत वाढली. त्यात काही नागपूर, औरंगाबाद, नगर, ठाणे अशा जिल्ह्यांतील रुग्णांचा नव्याने समावेश झाला. त्याळे दुसऱया आठवड्याच्या शेवटपर्यंत म्हणजे 16 ते 22 मार्च दरम्यान 41 पर्यंत कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य खात्यात नोंदली गेली होती. तिसऱया आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (ता. 23) राज्यात 15 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले.

- Fight with Corona : 'त्या' दोन रुग्णांना मिळालेला डिस्चार्ज दिलासा देणारा : महापौर

पाठपोठ दुसऱ्या दिवशी (ता.24) ही संख्या 18 पर्यंत वाढली आणि आठवड्यातील तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.25) 15 रुग्णांची भर पडली. त्यामुळे गेल्या आठवड्याभरात जितक्या रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत जास्त रुग्ण तीन दिवसांमध्ये आढळल्याची माहिती पुढे येत आहे. 

- पुणेकरांनो, आता शेतकरी राजा पुरवणार ताजी भाजी आणि फळं!

सलग पाच दिवस 10 पेक्षा जास्त रुग्ण

राज्यात 9 ते 20 मार्च या 11 दिवसांमध्ये 14 मार्चचा दिवस वगळता इतर सर्व दिवशी सरासरी पाच ते सहा रुग्ण आढळत होते. पण, 21 मार्चपासून प्रत्येक दिवशी दहा पेक्षा जास्त रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

कोरोनाशी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा